Homeमहाराष्ट्रसंगमनेरसंगमनेर हादरला! सहावीतल्या विद्यार्थिनीवर ॲॅसिड हल्ला; आरोपी फरार, परिसरात भीतीचे वातावरण

संगमनेर हादरला! सहावीतल्या विद्यार्थिनीवर ॲॅसिड हल्ला; आरोपी फरार, परिसरात भीतीचे वातावरण

संगमनेर/प्रतिनिधी :- तालुक्यातील वडगावपान येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲॅसिड हल्ला केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना हा भ्याड प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शाळेतून घरी जात असताना अचानक समोर आलेल्या एका युवकाने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक तातडीने मदतीला धावून आले. मात्र, तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. जखमी विद्यार्थिनीला तात्काळ लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रणखांब येथे लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असताना आता शाळकरी मुलीवर ॲॅसिड हल्ला झाल्याने संगमनेर तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये कायद्याचा धाक कमी झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
11 %
2.9kmh
100 %
Thu
35 °
Fri
36 °
Sat
29 °
Sun
31 °
Mon
34 °

Most Popular

error: Content is protected !!