Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर शहरातील विविध नागरी समस्यांवर मनसे आक्रमक; नगराध्यक्ष करण ससाणे यांना निवेदनाद्वारे...

श्रीरामपूर शहरातील विविध नागरी समस्यांवर मनसे आक्रमक; नगराध्यक्ष करण ससाणे यांना निवेदनाद्वारे १२ ठोस मागण्या

श्रीरामपूर (प्रतिनिधी): – शहरातील नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा व वाहतूक समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने नवनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे व नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरात अनेक वर्षांपासून प्रशासक राजवट असल्याने विविध नागरी प्रश्न प्रलंबित असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रश्नांवर त्वरित कार्यवाही आवश्यक असल्याचे मत यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

मनसेच्या केलेल्या प्रमुख मागण्यामध्ये श्रीरामपूर बाजारतळ येथील उद्यानामध्ये नागरिकांसाठी व्यायामाचे साहित्य तसेच लहान मुलांसाठी खेळणी बसवून उद्यानाचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी खुले करावे. शहरातील सर्व नाल्या व गटारींची दररोज साफसफाई करावी. सार्वजनिक शौचालयांची उभारणी करून जुन्या स्वच्छतागृहांची तात्काळ दुरुस्ती करावी. शहरातील सर्व रस्ते नव्याने करावेत व खराब झालेल्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी. नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.डास निर्मूलनासाठी संपूर्ण शहरात आठवड्यातून किमान एक दिवस नियमित फवारणी करण्यात यावी. तालुका पोलीस स्टेशन समोरील संत गाडगे महाराज उद्यानातील व्यायामाचे साहित्य त्वरित दुरुस्त करून लहान मुलांसाठी नवीन खेळणी बसवावीत. शहरातील प्रत्येक वार्डात बजरंग व्यायामशाळेच्या धर्तीवर व्यायामशाळा सुरू करण्यात याव्यात. प्रत्येक वार्डातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट दुरुस्त कराव्यात व ज्या भागात स्ट्रीट लाईट नाहीत तेथे नव्याने लाईट बसवाव्यात. गेल्या वर्षभरात निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, पार्किंगची सुविधा न देणाऱ्या इमारत मालकांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. नगरपरिषद अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून शाळांची दुरुस्ती व सीसीटीव्ही बसवावेत. शहरातील रस्त्यांच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने, सर्व भाजी विक्रेत्यांना नेहरू भाजी मंडईत स्थलांतरित करण्याची सक्त अंमलबजावणी करावी.

निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांवर येत्या आठ ते दहा दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, आंदोलनकर्ते जबाबदार राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निवेदनाच्या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शहराध्यक्ष सतीश कुदळे, रोजगार सेना तालुकाध्यक्ष नितीन जाधव, तालुका प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल ठोंबरे, तालुका संघटक आकाश साबळे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष व उपाध्यक्ष अरमान शेख, शहर संघटक निलेश सोनवणे, शहर चिटणीस मच्छिंद्र हिंगमिरे, शहर उपाध्यक्ष आर्यन शिंदे तसेच सुरेश शिंदे, किशोर शिंदे, रवी शिंदे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
13.1 ° C
13.1 °
13.1 °
44 %
2kmh
0 %
Tue
29 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!