Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार

श्रीरामपूर नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार

श्रीरामपूर प्रतिनिधी – श्रीरामपूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेल्या प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेवक सोनिया बिट्टू कक्कड व दीपक वमने, तसेच प्रभाग क्रमांक दोनमधील अपक्ष उमेदवार पैलवान अर्जुन दाभाडे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या सत्कार समारंभाचे आयोजन पत्रकार स्वप्निल सोनार, सौ. सपना सोनार, गोपाल शिंदे, मनीषा शिंदे, गणेश आव्हाड आणि कविता आव्हाड यांच्या वतीने करण्यात आले होते. निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या या तिन्ही नगरसेवकांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्रभाग क्रमांक दोनचे अपक्ष नगरसेवक पैलवान अर्जुन दाभाडे यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष विजू पवार, शुभम राणा, धनश्री दाभाडे हे उपस्थित होते. तर प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका सोनिया बिट्टू कक्कड यांच्या समवेत बिट्टू कक्कड, राजु कक्कड, अंबादास गांगुर्डे, अनिल वाघ, पियुष मोरे, मनोज गांगुर्डे, बाबू सहानी, राजु मगर, किरण कतारे हे उपस्थित होते.

सत्कारप्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित नगरसेवकांकडून नागरिकांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. शहरातील विकासकामांना गती देणे, मूलभूत सुविधा सक्षम करणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक कारभार करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या वेळी बोलताना नगरसेवकांनीही जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, हा विजय वैयक्तिक नसून सर्वसामान्य नागरिकांचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भावना व्यक्त केली.या सत्कार सोहळ्यामुळे श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नव्या नगरसेवकांकडून विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!