श्रीरामपूर/शिर्डी (प्रतिनिधी): कथित माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते यांच्याविरोधात प्रसारमाध्यमांची बदनामी करणे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचल्याच्या गंभीर आरोपाखाली दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. एस न्यूज मराठी चॅनल आणि संबंधित व्यक्तींची बदनामी केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिते (बी.एन.एस.) मधील महत्त्वाच्या कलमांखाली ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ज्यात एकाच दिवशी म्हणजे १० डिसेंबर २०२५ रोजी श्रीरामपूर येथे एस न्यूज मराठी वाहिनीचे कार्यकारी संपादक जयेश सावंत यांनी बी.एन.एस. कलम ३५१ (४) तर शिर्डी प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३५६ (२) असे गुन्हे दाखल केल्याने. कथित माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते यांच्याकडून एस न्यूज मराठी चॅनलची बदनामी आणि वैयक्तिक द्वेषातून ज्यांचा चॅनलशी संबंध नाही अशा लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शिर्डी साईबाबा संस्थानमधील तहसीलदार दरजेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांशी दमदाटी प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी शिर्डी पोलिसात कोते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भातील ‘एफआयआर’ आणि पोलीस ठाण्यातून मिलेलेल्या माहितीच्या आधारे एस न्यूज मराठी चॅनलने बातमी प्रसारित केली होती. बातमीच्या माध्यमातून कायदेशीर सत्य प्रकाशित केल्यानंतर कथित माहिती कार्यकर्ते दिगंबर कोते कोपरगाव न्यायालयात दिगंबर कोते यांचा जामीन रद्द करण्यात आला. त्यानंतर अनेक दिवस फरार असलेल्या दिगंबर कोते यांनी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातून जामीनावर बाहेर आल्यानंतर, कोपरगाव न्यायालायात जामीन नामंजूर झाल्याच्या रागातून कोते यांनी चॅनल आणि काही व्यक्तींची वैयक्तिक नावे घेऊन बदनामी करण्याचे सत्र सुरू केले. एवढेच नाही तर कोते यांच्याकडून वैयक्तिक द्वेषातून चॅनल आणि संबंधित व्यक्तींवर दबाव आणण्याचा व खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. आपले ‘मालिन चारित्र्य’ आणि ‘पाप लपवण्यासाठी’ ते प्रसार माध्यमांना बदनाम करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या गंभीर बदनामी प्रकरणी, एस न्यूज मराठी चॅनल प्रशासन आता शांत न बसता कथित माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. त्याच बरोबर प्रसिद्धीसाठी हपापलेल्या कथित माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते आणि त्यांच्या पाठीमागील षडयंत्रबाजांचा पुराव्यानिशी पोलखोल करून त्यांना कायदेशीर उत्तर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘खोटे गुन्हे आणि बदनामी’चा डाव फसला ‘दिगंबर कोते यांच्यावर २ गुन्हे दाखल
RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4
°
C
22.4
°
22.4
°
62 %
1.7kmh
100 %
Sat
35
°
Sun
36
°
Mon
39
°
Tue
38
°
Wed
37
°




