Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर न.प. निवडणुकीत भेटीगाठी, अफवा आणि उमेदवारीबाबत अजूनही गोंधळाचे वातावरण

श्रीरामपूर न.प. निवडणुकीत भेटीगाठी, अफवा आणि उमेदवारीबाबत अजूनही गोंधळाचे वातावरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडीने करण ससाणे यांचे नाव यापूर्वीच निश्चित करून प्रचाराला सुरुवात केली असून नगराध्यक्ष पद राखण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महायुतीत मात्र अद्यापही उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

शहरात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांशी संपर्क साधण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत आहेत. महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून अंतिम निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही. काही संभाव्य उमेदवारांनी पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न वाढवले असून, काही अपक्ष उमेदवारांनीही जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी नाकारली गेल्यास काही जण पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत श्रीरामपूरच्या राजकीय वातावरणात नवे कलाटणी दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगराध्यक्षपदासाठी सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये प्रकाश चित्ते (शिवसेना), सागर बेग (शिवसेना), मंजुश्री मुरकुटे (शिवसेना), अनुराधा आदिक (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), श्रीनिवास बिहाणी (भाजप) आणि संजय फंड (भाजप) यांचा समावेश आहे. श्रीनिवास बिहाणी यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत असून, त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, महायुतीकडून एकत्रित उमेदवार जाहीर झाला तर समीकरणात मोठा बदल होऊ शकतो. परंतु महायुतीतील पक्षांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीला थेट फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भेटीगाठी, अफवा, पक्षांतर आणि उमेदवारी यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळाचे आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, हे स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
12.1 ° C
12.1 °
12.1 °
48 %
1.6kmh
0 %
Tue
29 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!