Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर: राजकीय समीकरणे बदलली!

श्रीरामपूर नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर: राजकीय समीकरणे बदलली!

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- आगामी श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित प्रभाग निहाय आरक्षण अखेर जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे भवितव्य निश्चित झाले असून, शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. निवडणुकीसाठी शहरातील वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे.

नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, यामुळे कोणत्याही खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळू शकते. नगरपरिषदेच्या १७ प्रभागांतील एकूण ३४ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. शहरातील १७ प्रभागांमध्ये ‘ओबीसी’ आणि ‘सर्वसाधारण’ तसेच ‘एस.सी’ आणि ‘सर्वसाधारण’ असे आरक्षण पडले आहे. विशेषतः, प्रभाग क्रमांक १५ मध्ये दोन्ही जागा सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत, ज्यामुळे येथे मोठी चुरस पाहायला मिळेल.

आज सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर येथे आरक्षण सोडती काढण्याचा कार्यक्रम प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपमुख्य अधिकारी महेंद्र ताकपिरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे, आरपीआय या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते, माजी व भावी नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष पद सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारीची संधी मिळणार आहे. तसेच, अनेक प्रभागांमध्ये महिलांसाठीच्या आरक्षित जागांमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे

प्रभाग क्रमांक १ नागरी मागास प्रवर्ग (ओबीसी ) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ( एस सी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ( एस सी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग….प्रभाग क्रमांक

४ नागरी मागास प्रवर्ग (ओबीसी ) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक ५ नागरी मागास महिला प्रवर्ग (ओबीसी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक ६ नागरी मागास प्रवर्ग (ओबीसी ) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक ७ अनुसूचित जाती प्रवर्ग (एस सी ) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक ८ नागरी मागास महिला प्रवर्ग (ओबीसी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग…

प्रभाग क्रमांक ९ नागरी मागास प्रवर्ग (ओबीसी ) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक १० अनुसूचित जाती महिला प्रवर्ग (एस सी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक ११ नागरी मागास महिला प्रवर्ग (ओबीसी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग….

प्रभाग क्रमांक १२ अनुसुचित जाती प्रवर्ग (एस सी ) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग…

प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग (एस टी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग…

प्रभाग क्रमांक १४ अनुसूचित जाती प्रवर्ग ( एस सी ) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग…

प्रभाग क्रमांक १५ सर्वसाधारण महिला प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग…

प्रभाग क्रमांक १६ नागरी मागास महिला प्रवर्ग (ओबीसी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग…

प्रभाग क्रमांक १७ नागरी मागास महिला प्रवर्ग (ओबीसी महिला ) आणि सर्वसाधारण प्रवर्ग…

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या १७ प्रभागात पडलेल्या आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून. प्रभाग निहाय आरक्षण जाहीर होताच, सर्व इच्छुक उमेदवारांनी राजकीय समीकरणे जुळवायला सुरुवात केली असून, कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार, कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा ही राजकीय गुंतागुंत स्पष्ट होईल. या विषयी घेतलेला आढावा हे पाहण्यासाठी येथे 👉 क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!