Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरअल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग; नासीर शेखविरुद्ध पोस्को व भादंवि कलमान्वये गुन्हा...

अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग; नासीर शेखविरुद्ध पोस्को व भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी): तालुक्यातील पढेगाव परिसरातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरत “तु मला आवडतेस” असे म्हणत फिरायला नेण्याचा प्रस्ताव देत तसेच “मी भेटलो हे कोणालाही सांगू नको, नाहीतर तुझ्या वडिलांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देणाऱ्या नासीर हसन शेख (रा. पढेगाव) या इसमाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंड विधानातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई (वय ३०, धंदा शेतमजुरी, रा. इंदिरानगर, पढेगाव) ही आपल्या पती व दोन मुलांसह पढेगाव येथे वास्तव्यास आहे. तिचे पती टाटा एस गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पीडित मुलगी (वय १२) ही सध्या बेलापूर येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. पढेगावहुन शाळा दूर असल्याने ती मागील दोन वर्षांपासून तिच्या मामाकडे राहत आहे.

नासीर शेख हा पीडितेच्या पित्याचा मित्र असून मुलगी त्याला ओळखते. काही दिवसांपूर्वी २२ सप्टेंबर रोजी पीडितेच्या पित्याचे व नासीर शेख यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर त्यांच्यात बोलणे बंद झाले होते परंतु नासीर शेख हा वारंवार दारूच्या नशेत पीडितेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत असे. दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी पीडित मुलीच्या आईचे चुलत सासऱ्यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने कुटुंब कपडे खरेदीसाठी श्रीरामपूरला गेले होते. संध्याकाळी परतताना मुलगीही त्यांच्यासोबत होती. सायंकाळी सुमारे ७ वाजता पढेगाव येथे परतल्यानंतर त्यांनी पाहिले की नासीर शेख हा त्यांच्या दारात उभा राहून मोठ्याने शिवीगाळ करीत होता.

त्यावेळी मुलीने आपल्या आईला सकाळी घडलेली संपूर्ण घटना सांगितली . तिने सांगितले की, मी आज सकाळी सुमारे ११.१५ वाजता बेलापूर बस स्टॅण्ड येथे बसची वाट पाहत उभी असताना नासीर शेख माझ्याजवळ आला. त्याने माझा हात धरला आणि ‘तु मला आवडतेस, चल तुला फिरायला नेतो, बस माझ्या गाडीवर’ असे म्हणाला. मी घाबरून मागे सरले असता त्याने धमकी दिली की, मी भेटलो हे कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुझ्या वडिलांना जिवंत सोडणार नाही. भीतीपोटी मुलीने ही घटना कोणालाही सांगितली नव्हती. यानंतर कुटुंबीयांनी नासीर शेख याला पकडून थेट श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने त्यांना शहर ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलीसांनी नासीर हसन शेख याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८९५/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोस्को) कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!