Homeमहाराष्ट्रशिर्डीशिर्डीत सुजय विखेचे अज्ञातांनी बॅनर फाडले, विखे समर्थकांची पोलिसांत धाव: पोलिसांचा तपास...

शिर्डीत सुजय विखेचे अज्ञातांनी बॅनर फाडले, विखे समर्थकांची पोलिसांत धाव: पोलिसांचा तपास सुरु

शिर्डी : शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची तोडफोड केली. फक्त बॅनरवरच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या काही दुचाकींची अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विखे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घटनेची माहिती मिळताच मा. खा. डॉ. सुजय विखे समर्थक मोठ्या संख्येने शिर्डी पोलिस ठाण्यात धाव घेतली. समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. शिर्डी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून घटनेचा शोध शिर्डी पोलिस घेताय.

विखे पाटलांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शिर्डीतच अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामागे नेमके कोणते राजकीय कारण दडले आहे का..? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या या घटनेमुळे सुजय विखे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिस तपासात काय निष्पन्न होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत विखे समर्थकांनी अधिक माहिती दिली ती बघण्यासाठी येथे 👉 क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!