श्रीरामपूर/प्रतिनिधी :- सणासुदीच्या काळात महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्रीरामपूरमध्ये शिवसेनेने एक आगळावेगळा उपक्रम राबवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या गौरी-गणपती सजावट स्पर्धेने महिला वर्गात मोठा उत्साह निर्माण केला. शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. शिवसेनेचे युवा नेते रवींद्र जाधव यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक महिलेचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट सजावट केलेल्या विजेत्या महिलांना पैठणी साडी आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत सौ. अश्विनी मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर, मनीषा बोऱ्हाडे द्वितीय तर शीतल बचाटे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ,हिंदुत्ववादी नेते सागर बेग, आणि शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे, तालुकाप्रमुख प्रदीप वाघ, पत्रकार समीर माळवे यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींची उपस्थिती लक्षवेधी होती.
यावेळी, कुमारी तेजस्विनी शिंगारे हिने केलेल्या भाषणाने उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रवींद्र जाधव आणि सागर बेग यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले. हा अनोखा उपक्रम महिलांना सण-उत्सवात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम संधी ठरला.
संपूर्ण कार्यक्रम बघण्यासाठी येथे 👉क्लिक करा




