Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपुरात नशेच्या इंजेक्शन विरोधात पोलिसांची मोठी कारवाई, हजारोंचा मुद्देमाल जप्त!

श्रीरामपुरात नशेच्या इंजेक्शन विरोधात पोलिसांची मोठी कारवाई, हजारोंचा मुद्देमाल जप्त!

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहराला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. खबडी परिसरात सापळा रचून केलेल्या एका विशेष कारवाईत पोलिसांनी नशेची इंजेक्शन्स विकणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून नशेच्या इंजेक्शन आणि हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शहरातील खबडी परिसरात काही तरुण नशेची इंजेक्शन्स विकत असल्याची माहिती मिळलया नंतर. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकाने अत्यंत चलाखीने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल १० बाटल्या मेफेन्टरमाइन आढळून आल्या. पोलिसांच्या चौकशीत पकडलेल्या आरोपींनी आपली नावे अरबाज शेख आणि गौरव सोनटक्के अशी सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडून नशेच्या बाटल्यांसह, हे गुन्हे करण्यासाठी वापरली जाणारी होंडा अ‍ॅक्टिव्हा गाडी आणि इतर साहित्य असा एकूण हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे श्रीरामपुरात नशेच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न किती गांभीर्याने सुरू आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘या प्रकरणी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापुढेही अशाच पद्धतीने नशेच्या इंजेक्शन विरोधात आमची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या कडील पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरिक्षक अप्पासाहेब हंडाळ पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलिस अमोल पडोळे, अमोल गायकवाड, संपत बडे, सचिन दुकळे, राहुल पोळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल मिरा सरग तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आदींनी संयुक्तरित्या केली असून. शहरात प्रसारत असलेल्या नशेच्या जाळया विरोधात पोलिसांनी शहरातील प्रत्येक भागात अशा गैरकृत्यांना पायबंद घालण्याचा आमचा निर्धार आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काय आहे नेमकी हा प्रकार हे पहा 👉 क्लिक

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
44 %
0.8kmh
23 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
38 °

Most Popular

error: Content is protected !!