Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर शहर पोलिसांची गणेश विसर्जन मिरवणूक: पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप

श्रीरामपूर शहर पोलिसांची गणेश विसर्जन मिरवणूक: पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाचा शुक्रवारी सातव्या दिवशी समारोप झाला. यावेळी पोलीस ठाण्याच्या गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. नेहमी बंदोबस्तात व्यस्त असणारे पोलीस यावेळी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला. यावेळी पोलीस ठाण्यात स्थापन झालेल्या गणेशाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरून भव्य मिरवणूक काढली. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेधुंद होऊन नृत्याचा आनंद लुटला. श्रीरामपूर पोलीस ठाण्यातुन काढलेली ही मिरवणूक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे प्रवरा उजव्या कालवा येथे पोहोचली, जिथे गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या पोलिसांनी स्वतः मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद साजरा केला. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,दादाभाई मगरे,दीपक मेढे पोलीस हवालदार परदेशी,शेलार,भडकवाड, साठे,हापसे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे,अजित पठारे, आजिनाथ आंधळे, अंबादास आंधळे,राहुल पोळ, सचिन ढोकळे,मच्छिंद्र कातकडे आदींसह श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या गणपती विसर्जनाचा संपुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी 👉 क्लिक करा.

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
44 %
0.8kmh
23 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
38 °

Most Popular

error: Content is protected !!