Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरदिवसाढवळ्या शिवाजी रोडवर थरार; पिस्तूल हातात घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, CCTV फुटेजने वाढवलं...

दिवसाढवळ्या शिवाजी रोडवर थरार; पिस्तूल हातात घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, CCTV फुटेजने वाढवलं चिंताजनक वातावरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती व नेहमीच गजबजलेल्या छत्रपती शिवाजी रोडवर भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या प्रयत्नाने शहर हादरले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, संघर्ष दिघे हा युवक आपल्या मित्रांसोबत स्थानिक चहाच्या हॉटेलमध्ये बसला असताना, त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. हुजेफ शेख नावाचा युवक गावठी पिस्तूल घेऊन तेथे दाखल झाला होता. त्याने पिस्तूल लोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच क्षणी संघर्ष दिघे याने सावधगिरी बाळगून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हुजेफ शेख गोंधळून गेला व पळ काढण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान, दिघे व त्याच्या साथीदारांनी हुजेफचा पाठलाग केला. या वेळी हुजेफ शेखने पळून जाताना पाठलाग करणाऱ्यांवर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, मात्र या थरारक घटनेचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हुजेफ शेखचा पाठलाग करणाऱ्यांपैकी एकाच्या हातातही गावठी पिस्तूल स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे शहरात दोन गटांमध्ये शस्त्रबळावर वाद उफाळल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घेतली असून, हुजेफ शेखविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाठलाग करताना पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची पुन्हा एकदा परीक्षा लागली आहे. नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती व संताप लक्षात घेता, पोलिस प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भरदिवसा, मुख्य रस्त्यावर अशा प्रकारचा प्रकार घडणे हे अत्यंत गंभीर असून, गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

या गोळीबाराच्या प्रयत्नामुळे श्रीरामपूर शहरातील शांतता आणि सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज उघड झाल्यानंतर शहरात चर्चेला उधाण आले असून, गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असल्याची टीका होत आहे. आता या तपासातून नेमके कोणामागे कोणाचा हात आहे आणि यामध्ये अजून कितीजण सामील आहेत, हे उघड होणे आवश्यक आहे. एकंदरित, भरदिवसा वर्दळीच्या भागात पिस्तूल हातात घेऊन झालेला हा थरार शहरासाठी धोक्याची घंटा ठरला आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता श्रीरामपूरवासीयांचे डोळे लागले आहेत.

*नेमकी काय घडलं पाहण्यासाठी इथं क्लिक करा*

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
12.1 ° C
12.1 °
12.1 °
48 %
1.6kmh
0 %
Tue
29 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!