अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री व जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, चंद्रशेखर कदम आणि जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर नगर जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत जुन्या अनुभवी नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांचा समावेश करून सर्वसमावेशक रचना करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदावर ऋषिकेश भेते (नेवासा), यशवंत जगताप (अकोले), सतीश ससाणे (शिर्डी), योगीराज परदेशी (संगमनेर), दीपक पटोरे (श्रीरामपूर), किरण बोराडे (शिर्डी), काशिनाथ पाटील (संगमनेर), संदीप लोखंडे (श्रीरामपूर), संदीप सोयार (श्रीरामपूर) आणि ज्ञानेश्वर पेपे (नेवासा) यांची नियुक्ती झाली आहे.
सरचिटणीसपदी सीताराम भांगरे (अकोले), अशोक पवार (शिर्डी) आणि कांताबाई माळवे (शिर्डी) तर सचिवपदी किरणश्री दगडे (कोपरगाव), सोनालीताई नाईकवाडी (अकोले), अशोक देशमुख (नेवासा), अजित रस्कर (श्रीरामपूर), नारायण राठोड (श्रीरामपूर), राजेंद्र सांगळे (संगमनेर), अशोक जमधडे (शिर्डी) आणि भारत गित्ते (शिर्डी) यांची निवड झाली आहे.
कोषाध्यक्षपदी आकाश शेटे (नेवासा) यांची नियुक्ती झाली असून युवा, महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, किसान मोर्चा यांसह विविध आघाड्या, प्रकोष्ठ व सेल प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये विविध आघाड्या, प्रकोष्ठ व सेल यांमध्ये संयोजकांची निवड करण्यात आली आहे. कामगार आघाडीचे संयोजक श्री. सतीश पन्नालाल चव्हाण (कोपरगाव) असून, उद्योग आघाडीचे श्री. संपत गलांडे (संगमनेर) आहेत. व्यापार आघाडीचे नेतृत्व श्री. मारुती विजय बिंगले (श्रीरामपूर) करणार आहेत. उत्तर भारतीय आघाडीचे संयोजक श्री. राम शोभा योगी ठाकुर (शिर्डी) तर दक्षिण भारतीय आघाडीचे श्री. वेन्नापू सुर्य चक्र भावन्नरायन (शिर्डी) आहेत. वैद्यकीय आघाडीची जबाबदारी डॉ. बाळासाहेब कोंडीराम कोलते (नेवासा) यांच्याकडे देण्यात आली आहे. कायदा सेलचे संयोजक अॅड. अमित धुळगंड तर सहकार सेलचे श्री. आहेरराव निरदने असतील. मच्छिमार सेलसाठी श्री. सोमनाथ यशवंत पथवे (अकोले) यांची नियुक्ती झाली आहे. सोशल मिडिया सेलचे संयोजक श्री. भाऊसाहेब पुंजा वाकचौरे (अकोले) आहेत. आय.टी. सेलचे नेतृत्व श्री. आदिनाथ पटारे (नेवासा) करणार असून, माजी सैनिक सेलसाठी श्री. सतीश नामदेव झोळेकर (अकोले) यांची निवड झाली आहे. जेष्ठ नागरिक सेल व दिव्यांग सेलचे संयोजक अनुक्रमे श्री. खंडूबाबा भाऊसाहेब वाकचौरे (अकोले) आणि श्री. बाळासाहेब चौधरी (कोपरगाव) आहेत. बुद्धीजीवी सेलचे संयोजक अॅड. श्रीराम अरविंद गणपुले (संगमनेर) आहेत. अध्यात्मिक समन्वय आघाडीचे नेतृत्व ह.भ.प. योगेश महाराज कांदळकर (शिर्डी) करणार आहेत. क्रिडा प्रकोष्ठाचे संयोजक श्री. संदिप रुपचंद कर्डिले (नेवासा) तर जैन प्रकोष्ठासाठी श्री. राजेश शिवलाल भनसाळी (शिर्डी) यांची नियुक्ती झाली आहे. सांस्कृतिक सेलची जबाबदारी अरुणाताई पवार (संगमनेर) यांच्याकडे देण्यात आली आहे. आयुष्यमान भारत सेलचे संयोजक श्री. सचिन काळे (नेवासा) आहेत. पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे संयोजक श्री. अनिल पुंडलिक भनगडे (श्रीरामपूर) असून, राजस्थान प्रकोष्ठासाठी श्री. मदन बाबूलाल गुजर (नेवासा) यांची निवड झाली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ सेलची संयोजक सौ. वैष्णवी सोमेश्वर धुमाळ असतील.
महिला पदाधिकाऱ्यांमध्ये अलका परजणे, जयश्री कदम, मनीषा चव्हाण, राजश्री कोळपेकर, विद्या सोनवणे (कोपरगाव), अर्चना धीसागर, रुपाली वाघ, दीपश्री चौकोके, ललिता ओहेर, अर्चना डांगे, निर्मला दिघे (श्रीगोंदा), कांताताई घोरें, मेघाताई भगत, उज्ज्वला मुंढवे, अनिता भागवत, आशाताई धीसागर (संगमनेर), शशिकला पवार, प्रियांका लोटे (श्रीरामपूर), रश्मि जोशी, डॉ. विद्या कोलते, अभिन्ना मापारी, ऍड. सोनल वाघुरे, कल्पना कापगरे (नेवासा) यांचा समावेश आहे. तसेच सचिन देशमुख, नितीन कापसे, दादासाहेब गुंजाळ, डॉ. अशोक इथापे, अश्वाक कागलवडे, नरेंद्र टंडबीर, बाबासाहेब हस्के, सुशांत खरे, रावसाहेब धनवटे, साहेबराव आंधळे, अशोक कोळकेवर, सुहास गुंजाळ, कैलास खरे, डॉ. महेंद्र कोळे, हरिश्चंद्र चकोर, दीपक सॉस, दत्तात्रय कोले, लक्ष्मीकांत राठोड, प्रदीप बोकेणे, दत्तात्रय पोटे, रामहरी आहेर, मोहिते मास्तरी, बंपच लांडगे, जावेद जहागीरदार, गणेश राठी, शिरीष मुळे, मुकुंद लबडे, सुनील दिवटे, उज्वला खरात, विश्वास काळे, संगीताताई बर्डे, अंकुश काळे, रमेश बिडये, बाळासाहेब गाडेकर, राजेश शर्मा, संजय सोमवंशी, केशव भवर, सत्यम मुंदडा, मच्छिंद्र केकाण, शिवाजी वक्ते, शिवाजी जाधव आदींचा समावेश आहे.
विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, चंद्रशेखर कदम, शालिनीताई विखे पाटील, रवी बोरावके, राजेंद्र गोंदकर, विवेक कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. ही जंबो कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे.




