श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे एकत्रित निवेदन सादर करून प्रकाश आण्णा चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा, बनावट व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका लावत या गुन्ह्यातून त्यांचे नाव तात्काळ वगळण्याची मागणी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 678/2025 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकाश आण्णा चित्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वास असून, हे संपूर्ण प्रकरण एका नियोजित राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित महिलेसोबत प्रकाश आण्णा चित्ते यांची कोणतीही ओळख नाही. त्या महिलेबाबत कोणताही पूर्वसंपर्क नसताना त्यांच्याविरोधात एक काल्पनिक आणि खोडसाळ प्रकारची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. “ही एकप्रकारची बदनामी मोहीम असून, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धक्का पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे,” असेही नमूद करण्यात आले आहे. प्रकाश अण्णा चित्ते यांनी यापूर्वी मुल्ला कटर टोळी विरोधात सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने करत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण संघर्ष संपूर्ण शहरास माहित आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर दाखल झालेला हा गुन्हा विरोधकांनी रचलेल्या कटाचा भाग असून, त्यांचे सामाजिक आणि राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप नेत्यांनी केला.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मंडईत न बसवता चौकात बसवावा या मागणीसाठी प्रकाश आण्णा चित्ते यांनी उघड भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत नेत्यांनी म्हटले आहे की, “पुतळ्याच्या सन्मानासाठी उभा असलेल्या नेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.”सदर निवेदनावर भाजप नेते सुनील मुथा, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सिद्धार्थ मुरकुटे, आर पी आय चे सुरेंद्र थोरात, शिवसेना शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे, भाजप नेते बबन मुठे आम आदमीचे प्रवक्ते तिलक डुंगरवाल, मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबने मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, राजेंद्र सोनवणे, संजय पांडे, किरण लुनिया ,मा. नगरसेवक संतोष कांबळे, राजेंद्र कांबळे, राजेंद्र चव्हाण, शिवसेना नेते संजय छल्लारे, संजय राऊत, सुरेश सोनवणे सर, गौतम उपाध्ये , शत्रुघ्न गव्हाणे, गणेश भिसे, संजय यादव, तुषार बोबडे, सोमनाथ पतंगे, अजय नान्नोर, प्रशांत शहाणे, अमोल सोनवणे, अण्णासाहेब थोरात, शेखर आहेर, बाळासाहेब गाडेकर, संजय काळे, सतीश शेळके, आबा पवार, कैलास भनगे, आदेश मोरे, प्रवीण साळवे, नवनाथ पवार, देविदास वाघ, काका शेलार, दत्तात्रय ठाकरे, मच्छिंद्र बांद्रे, अशोक साळुंखे, सुनील खपके, रामेश्वर देसाई, अमोल राऊत, महेश आदिक, सचिन गायकवाड, गणेश काळे, संदीप गुंजाळ, पवन सलालकर, सुभाष पारखे, गणेश सलालकर, बाळासाहेब विटमोर, आकाश वाघ, संजय जाधव, बाळासाहेब हिवराळे, संदीप आदिक, विशाल जाधव, अशोक मोकळ, संजय गांगुर्डे, अक्षय विटनोर, अरुण मुठे, गणेश कोळसे, अनिल बोडके, विजय लांडे, विशाल कापडे, शिवा साठे, सागर कुदळे, प्रवीण फरगडे, रवींद्र मते, बाळासाहेब ढोरमारे आदी श्रीरामपूर शहरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्या असून, शहरातील नागरिकांतही याविषयी तीव्र संताप असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये प्रकाश आण्णा चित्ते यांच्याविषयी सहानुभूतीची लाट असून, या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. शेवटी सर्वपक्षीय प्रतिनिधींनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या कडे मागणी केली की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकाश आण्णा चित्ते यांचे नाव या गुन्ह्यातून तात्काळ वगळण्यात यावे, अन्यथा शहरात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.