श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे भीमसेना माथाडी व जनरल कामगार युनियन ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या युनियनच्या बैठकीत संघटनात्मक विस्तार, कामगार प्रश्न, व पुढील रणनीतीवर व्यापक चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ साठे हे होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीदरम्यान अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील संघटनेच्या विस्तारासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा अध्यक्षपदी रितेश भाऊ एडके यांची एकमताने निवड करण्यात आली. दीपक भाऊ साठे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेतील कार्यकर्त्यांनी या निवडीचे जोरदार स्वागत करत टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये युवा नेते सुहास भाऊ राठोड, आरपीआयचे मनोज भाऊ काळे, गणेश काटे, शिवा भाऊ साठे, संगीता गायकवाड, शाम मगर, विनोद पटाईत, अश्फाक शेख, संदीप रणनवरे, अमोल काळे, संजय वाव्हळ, गौतम ढोकणे, दादू जवंजळ, मनोज शेलार, हरी उमाप, राहुल गालफाडे, सुनील कल्याणकर, विजय पाठक, राहुल नवगिरे, किशोर निकाळजे, साबळे मिस्त्री यांच्यासह अनेक कामगार सहकारी आणि युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या माध्यमातून स्थानिक कामगारांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेले प्रयत्न, माथाडी कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत घ्यावयाचे पुढील पावले आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले. तसेच नव्या नेतृत्वाला संघटनेच्या उद्दिष्टांची माहिती देत संघटना अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, रितेश भाऊ एडके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील माथाडी व जनरल कामगारांसाठी ठोस कार्यवाही होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. संघटनेच्या पुढील कामकाजासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. या बैठकीचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते गणेश काते यांनी केले तर आभार युवा नेते सुहास राठोड यांनी मानले.