श्रीरामपूर – येथील विद्रोही विद्यार्थी संघटनेचे ॲड. अमोल सोनवणे यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्याच प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या क्रांतीकारी संदेशाचे पालन करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी श्रीरामपूर येथील खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयातून यशस्वीपणे एलएल.बी. पदवी मिळवली, याच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक, आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ॲड. सोनवणे यांच्या जिद्द, चिकाटी आणि सामाजिक जाणिवेची प्रशंसा केली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, अनेक वक्त्यांनी असे सांगितले की ॲड. अमोल सोनवणे हे नव्या पिढीतील प्रेरणादायी युवा नेतृत्व आहे.
या सन्मान समारंभ प्रसंगी शंभुक विद्यार्थी वसतिगृहाचे अशोकराव दिवे, बामसेफचे रमेश मकासरे, सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस शेळके, सर्जेराव देवरे, भारतीय बौद्ध महासभेचे सुगंध राव इंगळे, प्रकाश सावंत, के.सी. दाभाडे, निवृत्ती पगारे, भाऊसाहेब हिवराळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. सलीम शेख व अकबर शेख, बहुजन वंचित आघाडीचे संतोष त्रिभुवन, विजय जगताप, सुनिल वाघमारे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले) चे कॉ. जीवनराव सुरुडे, परिवर्तन फाउंडेशनचे मेजर कृष्णा सरदार, संभाजी कोळगे, डॉ. संजय दुशिंग, श्रीराम ट्रेडर्सचे रामभाऊ सुगुर, कवी रज्जाक शेख, कवी आनंदा साळवे, बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे सुरंजन साळवे, सक्षम फाउंडेशनचे सुशिल पठारे, अमोल मिसाळ, नामदेव शिंपी समाज पंच मंडळाचे कैलास खंदारे, राजमुद्रा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक मुश्ताकभाई तांबोळी, ॲड. राजेश बोर्डे, के.टी. साळवे, एफ.एन. वाघमारे, गौतम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष त्रिभुवन, विजय जगताप, पी.डी. सावंत, के.सी. दाभाडे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुक वसतिगृहाचे अशोकराव दिवे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सक्षम फाउंडेशनचे सुशिल पठारे यांनी केले. या सन्मानाच्या निमित्ताने उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तीनही घटकांची आजच्या काळातील गरज अधोरेखित करताना, ॲड. सोनवणे यांच्या समाजहितासाठीच्या पुढील कार्यात योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.