Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरसौ. प्रणिती चव्हाण यांची रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी निवड; आरोग्यसेवेत दिलेल्या योगदानाची...

सौ. प्रणिती चव्हाण यांची रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी निवड; आरोग्यसेवेत दिलेल्या योगदानाची दखल

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण शासकीय समिती (नियामक मंडळ) सदस्यपदी श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. प्रणिती दीपक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. हेमंत ओगले यांच्या शिफारसीवरून ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आपल्या विशेष कोट्यातून त्यांना हे स्थान बहाल केले आहे. सौ. प्रणिती चव्हाण यांचे कोरोनाकाळातील कार्य विशेषत्वाने उल्लेखनीय राहिले आहे. कोविडच्या कठीण काळात त्यांनी बाधित नागरिक, महिला व गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत पोहोचवण्यात पुढाकार घेतला. आरोग्य शिबिरांचे नियोजन, गंभीर आजारांवरील जनजागृती मोहीम, नवजात बालकांचे लसीकरण, बाळंतीण महिलांना पोषक आहाराचे वाटप अशा विविध आरोग्यविषयक उपक्रमांत त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला होता.

या कार्याची दखल घेत आमदार हेमंत ओगले यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीमध्ये नियुक्त केले असून, या समितीत श्रीरामपूर तालुक्याचे मा. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, वैद्यकीय अधीक्षक डी. एच. परदेशी, तसेच विविध शासकीय विभागप्रमुख व डॉक्टर्स यांचा समावेश आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सौ. प्रणिती चव्हाण यांनी सांगितले की, “मा. आमदार हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली समिती सदस्य म्हणून काम करताना जिल्हा आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे, तसेच तालुक्यात विविध आजारांसाठी शिबिरांचे आयोजन करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.

”यावेळी निवडीच्या निमित्ताने सौ. चव्हाण यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. उपस्थितांमध्ये आमदार श्री. हेमंत ओगले, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री. करणदादा ससाणे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष श्री. सचिन गुजर, माजी उपनगराध्यक्ष चरणदादा चव्हाण, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, सभापती सुधीर नवले, माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख, जिल्हा काँग्रेस सचिव ज्ञानेश्वर मुरकुटे, सौ. दीपालीताई ससाणे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, आण्णासाहेब डावखर, भरत कुंकलोल, राजेंद्र सोनवणे, मुन्ना पठाण, रीतेश रोटे यांचा समावेश होता. सर्व मान्यवरांनी सौ. प्रणिती चव्हाण यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन दिले. सदर निवडीनंतर श्रीरामपूर तालुक्यात महिलांना आरोग्यसुविधा व जनजागृती क्षेत्रात अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
27 ° C
27 °
27 °
84 %
3.4kmh
100 %
Fri
28 °
Sat
32 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

error: Content is protected !!