Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर जिल्हा तातडीने घोषित करा, अन्यथा जिल्हाभर घंटानाद आंदोलनाचा इशारा – जिल्हा...

श्रीरामपूर जिल्हा तातडीने घोषित करा, अन्यथा जिल्हाभर घंटानाद आंदोलनाचा इशारा – जिल्हा संघर्ष समितीचे निवेदन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गेली चार दशके प्रलंबित असलेल्या जिल्हा विभाजनाचा प्रश्‍न सामाजिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचा असून, शासनाने अहिल्यानगर जिल्हा नामांतर करून मूळ प्रश्नापासून लक्ष हटवले आहे. आता त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्याच्या विशेष मंत्रीमंडळ बैठकीत श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा, अन्यथा जिल्हाभरातील हनुमान मंदिरांमध्ये “श्रीराम तारक मंत्र” जप आणि “घंटानाद आंदोलन” करण्यात येईल, असा तीव्र इशारा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी दिला आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्याकडे आंदोलनाची पूर्वसूचना दिली असून, बैठकीत जिल्हा घोषित न झाल्यास मोठा जनआंदोलन उभा राहील, असे स्पष्ट केले आहे. यावेळी भागचंद औताडे, नागेशभाई सावंत, निलेश शेडगे, राजेंद्र गोरे, युवराज जगताप, बाबासाहेब चेडे, शरद डोळसे, ताराचंद शेख, अभिजित बोर्डे, इमरान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.लांडगे यांनी नमूद केले की, श्रीरामपूर जिल्हा निर्माण झाल्यास प्रशासनावरचा ताण कमी होईल. श्रीरामपूरचा प्रस्तावित जिल्हा हा निकषांनुसार सर्वात कमी खर्चिक आणि कार्यक्षम ठरेल. गोवा व दिल्ली राज्यांच्या तुलनेत खूप मोठा असलेल्या विद्यमान अहिल्यानगर जिल्ह्यामुळे आपत्कालीन सेवा आणि प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो. श्रीरामपूरमध्ये बहुतेक शासकीय कार्यालये कार्यरत असून, जिल्हा घोषित झाल्यास रोजगार, उद्योग, विकास योजना, तसेच ऐतिहासिक व अध्यात्मिक स्थळांचा विकास होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या मागणीसाठी संघर्ष समितीने सातत्याने लोकप्रतिनिधींना निवेदने दिली असून, आजवर अनेक आंदोलने केली आहेत.चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्हा विभाजनाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून लवकरच हा निर्णय होईल, असा विश्वासही लांडगे यांनी व्यक्त केला आहे. शेवटी, “श्रीराम” नावाने असलेल्या प्रस्तावित जिल्ह्यासाठी आता विलंब न करता निर्णय घ्यावा, अन्यथा हनुमान मंदिरांमधून घंटे वाजवत, “श्रीराम तारक मंत्र” जप करत संपूर्ण जिल्हाभर तीव्र घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
27 ° C
27 °
27 °
84 %
3.4kmh
100 %
Fri
28 °
Sat
32 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

error: Content is protected !!