Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरमहिलेचा विनयभंग करून पतीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीची श्रीरामपूर पोलिसांकडून धिंड

महिलेचा विनयभंग करून पतीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीची श्रीरामपूर पोलिसांकडून धिंड

श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहरातील मोरगे वस्ती परिसरात एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीची शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने बाजारपेठेत धिंड काढण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मोरगे वस्ती येथील एका घरात घुसून गणेश मुंढे (रा. भीमनगर, वॉर्ड क्र. ६), प्रसाद उर्फ प्रशांत मनोज भांड (रा. गिरमे चौक, वॉर्ड क्र. ३) आणि एक अनोळखी इसम यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ‘तुझा पती कुठे आहे?’ असे विचारून तिचा विनयभंग केला गेला. यावेळी आलेल्या तिच्या पतीवर कोयत्याने डोक्यावर हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी विनयभंग, गंभीर मारहाण, चोरी आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी प्रसाद उर्फ प्रशांत भांड याला अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरून आरोपीची धिंड काढण्यात आली. ही कारवाई जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जरब बसावी आणि जनतेमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने धिंड काढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरवासीयांनी या कृतीचे स्वागत करत पोलिसांचे अभिनंदन केले असून, अशा प्रकारच्या कठोर कारवायांमुळे गुन्हेगारीला रोख बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
40.7 ° C
40.7 °
40.7 °
16 %
0.5kmh
0 %
Sun
41 °
Mon
42 °
Tue
41 °
Wed
40 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!