Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरपंडित महेशजी व्यास यांच्यावर अज्ञात तरुणांची शिवीगाळ; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कठोर कारवाईची मागणी

पंडित महेशजी व्यास यांच्यावर अज्ञात तरुणांची शिवीगाळ; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कठोर कारवाईची मागणी

श्रीरामपूर/प्रतिनिधी :– बेलापूर येथील प्रसिद्ध प्रवचनकार पंडित महेशजी व्यास यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी केलेल्या शिवीगाळीच्या प्रकारामुळे संपूर्ण भागात संतापाची लाट उसळली आहे. सदर घटना गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास बेलापूरमधील झेंडा चौक परिसरात घडली.प्राप्त माहितीनुसार, पंडित महेशजी व्यास हे रात्री आपल्या वाहनाने झेंडा चौकाच्या दिशेने येत असताना, उक्कलगावच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या तिघा तरुणांसोबत त्यांच्या वाहनांची समोरासमोर टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले आणि संबंधित तरुणांनी पंडित महेशजी व्यास यांच्याशी अत्यंत अपमानास्पद शब्दांत वागणूक दिली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, संबंधित तिघा तरुणांचे चेहरे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

बेलापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संपत बढे यांनीही या घटनेची प्राथमिक माहिती दिली असून, पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर स्थानिक हिंदुत्ववादी संघटना, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि समर्थक यांनी पोलीस प्रशासनाकडे संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांचा ठाम आग्रह आहे की, अशा प्रकारच्या घटना समाजात धार्मिक विद्वेष निर्माण करू शकतात आणि शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरू शकतात, म्हणून संबंधित आरोपींना तत्काळ ओळखून कायदेशीर शिक्षेच्या कक्षेत आणणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांतून पोलिस प्रशासनावर त्वरित आणि कठोर कृतीसाठी दबाव वाढत असून, पोलीस विभागानेही याबाबत गांभीर्याने दखल घेत तपास सुरु केला आहे. समाजातील मान्यवर संत आणि धर्मप्रवक्त्यांच्या सन्मानासाठी हे एक महत्त्वाचे प्रकरण मानले जात आहे.

यावेळी भाजप नेते गणेश राठी, जिल्हा उपाध्यक्ष सतिष सौदागर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, मा. शहराध्यक्ष मारुती बिंगले, , शहर उपाध्यक्ष विजय आघाडे, विशाल अंभोरे, चंद्रकांत परदेशी, रवी पंडित, किरण कर्नावट, महेश सुळ, स्वामीराज कुलथे, अजित बाबेल, साजिद शेख, मिलिंद कुमार साळवे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
79 %
3kmh
100 %
Mon
30 °
Tue
26 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!