Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर भाजपमध्ये असंतोषाचे वादळ: नेतृत्व निवडीवर गंभीर प्रश्नचिन्ह

श्रीरामपूर भाजपमध्ये असंतोषाचे वादळ: नेतृत्व निवडीवर गंभीर प्रश्नचिन्ह

श्रीरामपूर/प्रतिनिधी :– तालुक्यात भाजपच्या तालुकाध्यक्ष निवडीनंतर पक्षांतर्गत नाराजीचे वादळ उठले आहे. अभिनंदनाच्या ऐवजी नाराजी व्यक्त करणाऱ्या फलकांमुळे नेतृत्व निवडीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वर्षानुवर्षे निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या अथवा आर्थिक बळ असलेल्या व्यक्तींना संधी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून अप्रत्यक्षरित्या फलकांद्वारे करण्यात आला आहे. “फॉर्च्युनर गाडी पाहिजे”, “डीएनए काँग्रेसचा असावा” अशा व्यंगात्मक टिप्पणींमधून कार्यकर्त्यांचा रोष स्पष्टपणे व्यक्त झाला आहे.

भाजपने आजवर “संघटन महत्त्वाचे” या तत्त्वावर भर दिला असला, तरी श्रीरामपूरमधील घटनांनी या भूमिकेला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. यासोबतच नव्या शहराध्यक्षांचे अभिनंदन करणारे फलक नगरपालिका प्रशासनाने हटवल्याने वाद आणखी गडद झाला आहे. कार्यकर्त्यांच्या मते, जर फलक हटवण्याचा निर्णय नियमांनुसार झाला असेल तर ठीक; अन्यथा राजकीय दबावाखाली घेतलेला निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. या साऱ्या घडामोडींमुळे श्रीरामपूरमधील वाद केवळ नाराजीपुरता मर्यादित न राहता नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान आणि योगदानाची दखल न घेतल्यास संघटनात्मक उणिवा वाढून निवडणूक कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा इशारा या घटनांतून मिळतो आहे.

दरम्यान, भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना कोणताही पक्षांतरण वाद नसल्याचे स्पष्ट केले. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून सर्वांना न्याय देण्याची भूमिका नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शहरातील पोस्टरबाजी आणि पक्षांतर्गत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. श्रीरामपूरमधील हा प्रसंग भाजपसाठी अंतर्मुख होण्याची संधी असून, कार्यकर्त्यांच्या भावना, निष्ठा आणि योगदानाचा आदर राखल्याशिवाय संघटन बळकट होऊ शकत नाही, हे या वादातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
light rain
25.4 ° C
25.4 °
25.4 °
91 %
2.1kmh
100 %
Mon
30 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!