Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरमध्ये शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; दोन आरोपी ताब्यात

श्रीरामपूरमध्ये शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; दोन आरोपी ताब्यात

श्रीरामपूर : शासकीय कामासाठी प्रवास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वर्दीवर असतानाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सचिन रूपचंद दुकने यांना संकेत राजनाथ यादव आणि सर्वेश राजनाथ यादव या दोन आरोपींनी प्रथम श्रीरामपूर बस स्थानक येथे वाद घालून त्रास दिला. या वादानंतर, दोघांनी नेवासा रोडवरील पुलाजवळ बस अडवून दुकने यांना बसमधून खाली उतरवले आणि त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी जोरदार हल्ला चढवला.

घटनेची गंभीरता लक्षात घेता, दुकने यांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांना संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या आदेशावरून पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली आणि त्वरीत कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४२५/२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १३२, १२१, १२६(२), ३५२ व ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, याप्रकरणाचा तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख करत आहेत.

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेनंतर पोलीस दलात संतापाची भावना व्यक्त होत असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पोलिस प्रशासनाने देखील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेने पोलिस दलाच्या प्रतिष्ठेला आव्हान देणाऱ्या घटनांबाबत अधिक तीव्रपणे दखल घेण्याची गरज अधोरेखित केली आहे. शासकीय यंत्रणांवर होणारे असे हल्ले थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
27.1 ° C
27.1 °
27.1 °
82 %
1.5kmh
100 %
Sun
27 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
31 °
Thu
28 °

Most Popular

error: Content is protected !!