नेवासा/प्रतिनिधी :– तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान, वरखेड येथे पारंपरिक तसेच धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदाही दक्ष पोलीस मित्रांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने बंदोबस्ताचे काम उत्तमरित्या पार पाडले.
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खाडे तसेच श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या योग्य मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण बंदोबस्त राबवण्यात आला. दक्ष पोलीस मित्रांनी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा सहकार्य आणि भाविकांना आवश्यक माहिती देणे या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळल्या. यावेळी दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शहादेव मुंगसे साहेब स्वतः उपस्थित राहून सेवा बजावत होते. त्यांनी देवस्थान ट्रस्टचे आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले की, “ह्या पवित्र कार्यात सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी अत्यंत गौरवाचे व समाधानाचे आहे.”
दक्ष पोलीस मित्रांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि सेवाभावनेने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली असून, भाविकांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. यामुळे भाविकांनी शांततेत, सुरक्षिततेत व भक्तिभावाने दर्शन व धार्मिक विधींचा लाभ घेतला. श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान वरखेड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बंदोबस्त अतिशय सुरळीत व निर्विघ्न पार पडल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. दक्ष पोलीस मित्रांचा हा आदर्श सेवा उपक्रम भविष्यातही अशाच पद्धतीने अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दक्ष पोलीस मित्रांचा श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान वरखेड येथे यशस्वी बंदोबस्त
Jharkhand
overcast clouds
29.7
°
C
29.7
°
29.7
°
70 %
4.5kmh
100 %
Sun
30
°
Mon
29
°
Tue
27
°
Wed
30
°
Thu
31
°