Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरशिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार मेळावा; संसारोपयोगी भांडे संचाचे वितरण

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार मेळावा; संसारोपयोगी भांडे संचाचे वितरण

श्रीरामपूर/प्रतिनिधी – शहरातील शिवसेना बांधकाम कामगार सेना यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कामगारांना संसारोपयोगी भांडे संचाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मा. खा. सदाशिव लोखंडे आणि शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष प्रीतम धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. सदाशिव लोखंडे यांचे स्वीय सहाय्यक शिवाजीराव दिशागत, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे, तालुका प्रमुख प्रदीप वाघ, शहर प्रमुख उमेश पवार, बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ, तालुका संघटक पप्पू महाराज, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख राजश्रीताई होवाळ, युवासेना तालुका प्रमुख संदीप दातीर, उपतालुका प्रमुख हरी मुठे, शहर प्रमुख राहुल भंडारी तसेच अन्य अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बांधकाम कामगारांसाठी मा. खा. सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आयुक्त कार्यालयात केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी कामगारांना नोंदणी करून घेऊन महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शिवसेना आणि शिवसेना बांधकाम कामगार सेना कामगारांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विशाल शिरसाठ यांनी सर्व मान्यवरांचे आणि कामगारांचे आभार मानत, भविष्यातही कामगारांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवसेना बांधकाम श्रीरामपुर सेनेचे उपजिल्हाप्रमुख इम्रान शेख , तालुका प्रमुख बाबासाहेब भालेराव,उपतालुका प्रमुख हारून शहा, तालुका संघटक घनश्याम सोनवणे, तालुका सचिव संतोष निकम, शहर संघटक हसन शहा , शहर सचिव संदीप उंडे , अमोल शिरसाठ, संदीप लिहिणार, जालिंदर औटी, उपशहर प्रमुख सुनील सोनवणे यांच्यासह सर्व शिवसैनिक तसेच क्रांतिवीर बांधकाम कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
86 %
2.9kmh
100 %
Tue
26 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!