Homeमहाराष्ट्रवरूडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वरूडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पैठण/प्रतिनिधी :– तालुक्यातील वरूडी येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. अ भा महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष प्रकाश दिलवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य शामभाऊ आहेर, सध्याचे ग्रामपंचायत सदस्य संजय सदावर्ते, चंदू आहेर, मधुकर आहेर, रावसाहेब गायकवाड, मंगेश सदावर्ते, विकास सदावर्ते, योगेश सदावर्ते, श्रीमंत सदावर्ते, रामेश्वर सदावर्ते, आप्पासाहेब सदावर्ते, प्रेम आहेर, नंदू आहेर, कृष्णा सदावर्ते तसेच महिला वर्गातील फुलाबाई सदावर्ते, कांताबाई सदावर्ते, फुलाबाई चाबूकसवार, छायाबाई आहेर, सध्या आहेर आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी एकत्र येऊन डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या सामाजिक समतेच्या संदेशाला उजाळा देत जयंती साजरी केली. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शांततेत व उत्साहात पार पडले. गावकरी व महिला मंडळींनीही सक्रिय सहभाग घेत समाजात बंधुतेचा संदेश दिला.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
40.7 ° C
40.7 °
40.7 °
16 %
0.5kmh
0 %
Sun
41 °
Mon
42 °
Tue
41 °
Wed
40 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!