Homeखेळ‘‘3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप’वर महाराष्ट्राचा दणदणीत विजय

‘‘3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप’वर महाराष्ट्राचा दणदणीत विजय

श्रिया गोठोस्कर सर्वोत्तम खेळाडू, कोपरगावच्या अनुष्का बनकरचे पहिलेच स्पर्धेत सुवर्ण!

तेलंगणा :– येथील पी जे आर स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. कर्णधार श्रिया गोठोस्करच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने यजमान तेलंगणा संघाला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे, कोपरगावची अनुष्का बनकर हिने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.या स्पर्धेत देशभरातून आठ राज्यांचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात सुरुवातीला यजमान तेलंगणा संघाने आघाडी घेत पहिल्या सेटमध्ये ४ गुणांनी पुढे होते. मात्र, श्रिया गोठोस्कर, संजना गोठोस्कर आणि अरमान भावे यांच्या संघर्षपूर्ण खेळामुळे महाराष्ट्राने १९-१९ अशी बरोबरी साधत पहिला सेट २१-१९ ने जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही महाराष्ट्राच्या मुलींनी आत्मविश्वासाने खेळ करत २१-१७ ने सेट आणि सामना जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकही सेट न गमावता परिपूर्ण विजय नोंदवला. महाराष्ट्र संघाच्या या यशात श्रिया गोठोस्कर हिची कामगिरी विशेष ठरली. तिच्या नेतृत्वगुणांबरोबरच उत्कृष्ट खेळामुळे तिला ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ हा मान मिळाला. संघातील उमा सायगावकर, अरमान भावे, उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर आणि अनुष्का बनकर यांनीही प्रभावी खेळ सादर केला.

या यशस्वी संघाचे प्रशिक्षक नितीन बलराज यांनी संघाला उत्तम मार्गदर्शन दिले. महाराष्ट्राच्या या यशाबद्दल गोदावरी बायोरिफायनरीचे अध्यक्ष श्री. सुहास गाडगे, प्राचार्य के. एल. वाकचौरे, संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल हरेगावच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव, फेडरेशनचे सचिव श्री. मारुती हजारे, आणि महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री. स्वामीराज कुलथे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा विजय महाराष्ट्राच्या महिला खेळकांची मेहनत, एकजूट आणि जिद्दीचे प्रतीक ठरला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू अनुष्का बनकर हिच्या रूपात महाराष्ट्राला एक चमकता तारा मिळाला आहे. या यशामुळे राज्यात व्हॉलिबॉल खेळाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे, हे निश्चित!

पी जे आर स्टेडियम, तेलंगणा येथे पार पडलेल्या पहिल्या 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्राच्या मुलींनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या मुलांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात अंतिम निकाल महाराष्ट्र – सुवर्णपदक, तेलंगणा – रौप्यपदक, हरियाणा– कांस्यपदक तर मुलांच्या गटात तेलंगणा–सुवर्णपदक, पंजाब– रौप्यपदक, महाराष्ट्र –कांस्यपदक वर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने कर्णधार श्रिया गोठोस्करच्या नेतृत्वाखाली यजमान तेलंगणा संघाला अंतिम सामन्यात सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी एकही सेट न गमावता अखंड वर्चस्व गाजवले. व मुलांच्या विभागात तेलंगणा संघाने दमदार कामगिरी करत सुवर्ण पटकावले, तर महाराष्ट्र संघाने संघर्षपूर्ण खेळ करत कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत देशभरातील आठ राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा नवोदित आणि युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवण्याचे उत्कृष्ट व्यासपीठ ठरली.

चौकट

“प्रत्येक खेळामध्ये मुला-मुलींनी चिकाटीने सराव केला, तर निश्चितच आगामी काही वर्षांमध्ये भारत विश्व क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल असेल. तेलंगणामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी मोठ्या गटात खेळताना सुरेख खेळ करत विजेतेपद पटकावले. युवा खेळाडूंनी खेळाकडे केवळ छंद म्हणून नव्हे, तर करिअर म्हणून पाहणे गरजेचे आहे.”— श्री. गौरव डेंगळे,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल, कोपरगाव

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
84 %
2.9kmh
92 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °

Most Popular

error: Content is protected !!