Homeखेळकर्णधार श्रिया गोठोस्करच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची दमदार कामगिरी; उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ...

कर्णधार श्रिया गोठोस्करच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची दमदार कामगिरी; उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला!

चंदानगर, तेलंगणा (गौरव डेंगळे) – चंदानगर येथील पीजेआर क्रीडा संकुलात सुरू झालेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने जबरदस्त खेळी करत स्पर्धेची प्रभावी सुरुवात केली आहे. कर्णधार श्रिया गोठोस्करच्या नेत्रदीपक नेतृत्वात खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही संघांवर सरळ विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

पहिल्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर २१-०७ व २१-१९ असा विजय मिळवून स्पर्धेत धमाकेदार प्रवेश केला. श्रिया गोठोस्कर, उमा आणि आरमान यांच्या संयमित व लयबद्ध खेळीमुळे छत्तीसगड संघाला पहिल्या सेटपासूनच कुठलीही संधी मिळू दिली नाही. श्रिया आणि उमाच्या जोरदार अटॅकिंग खेळीने पहिला सेट २१-०७ ने संपवला. अरमानच्या अचूक सेटिंगचा देखील सामना भरपूर फायदा झाला. दुसऱ्या सेटमध्ये छत्तीसगड संघाने जोरदार पुनरागमन करत सामना अटीतटीचा केला. १५-१९ अशी पिछाडी असतानाही महाराष्ट्राने जिद्द न सोडता अप्रतिम पुनरागमन करत १९-१९ अशी बरोबरी साधली. यानंतर श्रियाने जबरदस्त संयम राखत सलग दोन गुण मिळवले आणि सामना २१-१९ असा जिंकून दिला.

साखळीतील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघावर २१-१३ व २३-२१ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही संघाने संयम, कौशल्य आणि खेळात सातत्य राखले. दुसऱ्या सेटमध्ये मध्य प्रदेशने कठीण लढत दिली, मात्र निर्णायक क्षणी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले प्राविण्य सिद्ध करत विजय मिळवला. या दोन दणदणीत विजयांमुळे महाराष्ट्र हा उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. आता साखळीतील अखेरचा सामना महाराष्ट्राचा दिव-दमन संघाशी होणार आहे, आणि त्या सामन्यातही महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम राहील, अशी अपेक्षा आहे. कर्णधार श्रिया गोठोस्करच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा संघ सध्या शानदार फॉर्मात असून, स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
84 %
2.9kmh
92 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °

Most Popular

error: Content is protected !!