Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरक्रांतिसूर्य महात्मा फुलेंमुळे स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम – केतन खोरे

क्रांतिसूर्य महात्मा फुलेंमुळे स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम – केतन खोरे

श्रीरामपूर/प्रतिनिधी :– भारतात स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त मोरया फाउंडेशनच्या वतीने गुलमोहर कॉलनी येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी महात्मा फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की, “महात्मा फुलेंमुळे आज महिलांना सर्वच क्षेत्रात संधी मिळत असून त्यांच्यामुळेच भारतात स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत झाला.

“खोरे पुढे म्हणाले, “महात्मा फुले यांनी रूढी-परंपरांविरुद्ध लढा देत शिक्षण, समता आणि स्त्री स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर झगडले. त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून त्या काळात एक क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यामुळे आजच्या महिलांना समाजात मान-सन्मान आणि स्वतंत्र ओळख मिळाली आहे. महाराष्ट्राच्या मातीने अशा थोर समाजसुधारकाला घडवल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

कार्यक्रमात माजी नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे, निवृत्त नायब तहसीलदार अनिल उनवणे, सोपान शिंदे, विलास भगत, विवेक भोईर, राहुल सागडे, तृप्ती भगत, सविता घोडेकर, मनीषा बर्डे, अनिता गोरे, रेखा होते, अनिता पाटील, वर्षा भोईर, प्रज्ञा उनवणे, समीक्षा भगत, शौर्यजा खोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करून सामाजिक समतेचा संदेश जनमानसात पोहचवण्याचा संकल्प केला.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
86 %
2.9kmh
100 %
Tue
26 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!