Homeमहाराष्ट्रउद्या मांगिरबाबा यात्रेनिमित्त आमदार केसरी भव्य कुस्ती स्पर्धा

उद्या मांगिरबाबा यात्रेनिमित्त आमदार केसरी भव्य कुस्ती स्पर्धा

वैजापूर : तालुक्यातील थोरवाघलगाव येथील मांगीरबाबा यात्रोत्सवास आज गुरुवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे.यात्रेच्या निमित्ताने आमदार केसरी भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या असून उद्या शुक्रवारी दुपारी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील अंतिम विजेत्या पैलवानास उद्योजक कैलास पवार यांच्यातर्फे मानाची चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. आज गुरुवारी सायंकाळी यात्रेच्या निमित्ताने बारा गाड्या ओढण्यात येणार आहे. त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करून यात्रोत्सव साजरा होईल. सायंकाळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या शुक्रवार दुपारी ३ वाजता वैजापूर-गंगापूर महामार्गालगत थोरवाघालगाव जवळ कुस्ती स्पर्धेला सुरुवात होईल.याप्रसंगी पै. स्वराज तामखेडे विरुद्ध पै. ऋतिक राजपूत यांच्यासह कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नामवंत पैलवानांची जंगी कुस्त्या होणार आहे. त्यामुळे कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने कुस्त्या पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन यात्रा कमिटी व थोरवाघलगाव ग्रामस्थांनी केले आहे.स्पर्धेतील विविध गटातील कुस्ती विजेत्या पैलवानांना आमदार रमेश बोरनारे, सरपंच कैलास सातपुते, राजे मित्र मंडळ, नानासाहेब थोरात, सुनील कारभार व परसराम मोईन, आकाश अर्थमुव्हर्स, गणेश कृषी सेवा केंद्र व अष्टविनायक दूध संकलन केंद्र, संतोष राऊत, मातोश्री अर्थमुव्हर्स व जयवंती अर्थमुव्हर्स, रमेश त्रिभुवन, हंसराज एकनाथ मोईन, घनश्याम बुट्टे व वामन बुट्टे, विष्णू राऊत व विठ्ठल मोईन, अनिल मोईन, पोलीस शिपाई सागर शिंदे, संजय जाधव यांच्याकडून ३१ हजार रुपये पासून ३१०० पर्यंत रोख रक्कम स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे.

कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ स्वामी विश्वनाथगिरी महाराज, आमदार रमेश बोरनारे, माजी नगरसेवक साबेरभाई, माजी आमदार भाऊसाहेव चिकटगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, उद्योजक कैलास पवार, शिवसेना सर्कल प्रमुख नानासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. कुस्ती स्पर्धेचे समालोचन जालना येथील पैलवान शरद भालेराव हे करणार आहे. सदर स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठलीही दुखापत झाल्यास पैलवान स्वतः जबाबदार राहील. अंतिम कुस्ती निकाल लागल्यानंतर बक्षीस देण्यात येईल. नुरा कुस्ती लावण्यात येणार नाही, असे आवाहन यात्रा कमिटी व थोरवाघलगाव ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
79 %
2.4kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!