Homeमहाराष्ट्रराहुरीसंत गाडगेबाबा आश्रम शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; मनसेची तीव्र प्रतिक्रिया – दोषींवर...

संत गाडगेबाबा आश्रम शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; मनसेची तीव्र प्रतिक्रिया – दोषींवर त्वरित कारवाईची मागणी

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील ख्याती प्राप्त संत गाडगेबाबा आश्रम शाळेत एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतीलच एका शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित नराधम शिक्षकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीने आपल्या सोबत झालेला अमानुष प्रकार शाळेतील इतर शिक्षकांना सांगितला होता. मात्र दुर्दैवाने, शाळेतील शिक्षक वर्गाने वेळेवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे त्या विद्यार्थिनीला न्याय मिळण्याऐवजी अन्याय आणि मनस्ताप सहन करावा लागला. शिक्षकांनी जर वेळेवर तक्रारीची गंभीर दखल घेतली असती, तर हा प्रकार एवढा वाढला नसता, अशी प्रतिक्रिया आता पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे.

या घटनेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र संताप व्यक्त करत संबंधित आरोपी शिक्षकास तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी आणि या प्रकाराची माहिती असूनही दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवरही निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा मनसेकडून संत गाडगेबाबा आश्रम शाळेसमोर तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.या आंदोलनप्रसंगी मनसेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, शहराध्यक्ष प्रतीक विधाते, उपतालुकाध्यक्ष राहुल पिले, तालुकाध्यक्ष मनोज जाधव, दीपक वराळे, विद्यार्थी सेनेचे संघटक सागर माने, तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, शहराध्यक्ष संदेश गायकवाड, युवराज कोकाटे, प्रनेश चव्हाण, जालू घाडगे यांसह इतर अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकारामुळे शाळेतील व्यवस्थापन, सुरक्षा प्रणाली, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडित मुलीस न्याय मिळावा, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत असून, आरोपी शिक्षकास कठोर शासन होईपर्यंत हा मुद्दा गृहित धरला जाणार नाही, असा निर्धार मनसेने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
79 %
2.4kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!