Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरअवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठी कारवाई, तब्बल 54.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त,...

अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठी कारवाई, तब्बल 54.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत

अवैध वाळू उपशावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाई

श्रीरामपूर – तालुक्यातील मातुलठाण शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 54 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी अवैध वाळू उपशाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर 8 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मातुलठाण येथील नदीपात्रात ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या साहाय्याने वाळू चोरीने उपसली जात असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. या पथकात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोहेकॉ. शंकर चौधरी, पोना. सचिन धनाड, पोना. रामेश्वर वेताळ, पोकॉ. सुनिल दिघे आणि श्रीरामपूर तालुका पो.स्टे. चे पोसई सतिष डौले, पोसई संदीप मुरकुटे, पोहेकॉ. प्रशांत रननवरे, पोकॉ. विनोद कुदनर यांचा समावेश होता.

सदर पथकाने पहाटे 3.45 वाजता मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकत वाळू भरून असलेले 8 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि 2 मोटारसायकली असा एकूण 54.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच काही चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाले. मात्र चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये आकाश अभिमन्यु ठोंबरे (रा. पुरणगाव, ता. वैजापूर), अतीश दत्तु रोठे (रा. हिंगोणी, ता. वैजापूर), गणेश कैलास पवार (रा. लाखगंगा, ता. वैजापूर), सुमित धर्मराज ठोंबरे (जेसीबी चालक, रा. पुरणगाव, ता. वैजापूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 8 ट्रॅक्टर ट्रॉली (स्वराज, सोनालीका, आयशर, ड्युट्झ फाह्र) – 34.00 लाख रु. जेसीबी – 20.00 लाख रु. मोटारसायकली – 60 हजार रु. एकूण किंमत – 54,60,000/- रुपये ताब्यात घेतलेले वाहन व वाळूसह मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईबाबत पोहेकॉ. शंकर संपतराव चौधरी यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 199/2025 भा.दं.वि. 303(2), 3(5) व पर्यावरण संरक्षण अधिनियम 3/15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई संदीप मुरकुटे करत आहेत. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोनि. दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे वाळू माफियांना चांगलाच दणका बसला आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
87 %
1.5kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!