Homeमहाराष्ट्रअहिल्यानगरएफ.आर.एस. प्रणालीविरोधात अंगणवाडी सेविकांचा एल्गार, ८ एप्रिलपासून टीएचआर वाटपावर बहिष्कार

एफ.आर.एस. प्रणालीविरोधात अंगणवाडी सेविकांचा एल्गार, ८ एप्रिलपासून टीएचआर वाटपावर बहिष्कार

अहिल्यानगर – एफ.आर.एस. (फूड रेशन सिस्टीम) प्रणालीमधून होणाऱ्या टिएक-होम-रेशन (टीएचआर) वाटपातील तांत्रिक त्रुटी, वाढलेला कामाचा बोजा आणि अंगणवाडी सेविका-मदतनीसांवर होणारा अन्याय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका-मदतनीस कर्मचारी युनियनने ८ एप्रिल २०२५ पासून एफ.आर.एस. प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या टीएचआर वाटपावर बहिष्कार पुकारला आहे. या निर्णयानंतर युनियनच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. मनोज ससे यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर केले. यावेळी युनियनचे नेते कॉ. राजेंद्र बावके, कॉ. मदिना शेख व कॉ. जीवन सुरुडे उपस्थित होते.

यावेळी युनियनने एफ.आर.एस. प्रणालीतील अनेक तांत्रिक व यंत्रणात्मक अडचणींचा सविस्तर पाढा मांडला. नेटवर्कची असमर्थता, ओटीपी न येणे, केवायसी अपूर्ण राहणे, फोटो अपलोड न होणे, पोषण ट्रॅकर व एफ.आर.एस. प्रशिक्षणाचा अभाव, Vi नेटवर्कची मर्यादा, डॅशबोर्डवर माहिती न पोहोचणे, पालकांकडून मिळणारा विरोध इत्यादी अनेक मुद्दे समोर ठेवत, सदर प्रणालीमुळे सेविकांचे मानसिक व शारीरिक हाल होत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनाकडून जबरदस्तीने काम करून घेण्याचा आरोप करत युनियनने मागणी केली की, पुर्वीप्रमाणे रजिस्टरच्या माध्यमातून टीएचआर वाटप करण्यास परवानगी द्यावी. तसेच एफ.आर.एस. व पोषण ट्रॅकर प्रणाली सुलभ करून सेविकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, नेटवर्क असलेल्या कंपनीचे सिमकार्ड पुरवावेत, आणि प्रत्येक प्रकल्प स्तरावर तांत्रिक सहाय्यक नेमावा.या निर्णयामुळे जिल्हा प्रशासनासमोर तातडीची उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

देशभरातील अंगणवाडी सेविका एफ.आर.एस. प्रणालीविरोधात आंदोलन करत असून, महाराष्ट्रातील सेविका–मदतनीसांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. ८ एप्रिलपासून रजिस्टरच्या आधारे टीएचआर वाटप केला जाईल आणि याच नोटीसला अधिकृत मानावे, असे स्पष्ट करत युनियनने संघर्षाची भूमिका घेतली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सेविका–मदतनीसांच्या या ठाम भूमिकेमुळे महिला व बालविकास विभागाने तातडीने सकारात्मक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. युनियनच्या म्हणण्यानुसार, योग्य त्या सुधारणा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.7 ° C
25.7 °
25.7 °
88 %
0.5kmh
100 %
Mon
26 °
Tue
27 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
32 °

Most Popular

error: Content is protected !!