Homeमहाराष्ट्रगुंडोपंत ईश्वरा पाटील कारभारी यांना "आदर्श संत सदगुरू बाळु मामा सेवेकरी" पुरस्काराने...

गुंडोपंत ईश्वरा पाटील कारभारी यांना “आदर्श संत सदगुरू बाळु मामा सेवेकरी” पुरस्काराने सन्मानित

गुंडोपंत ईश्वरा पाटील कारभारी यांच्या सन्मानामुळे संतपरंपरेच्या कार्याला नवी दिशा लाभेल

पुणे – समाजसेवा, अध्यात्म, वंचितांसाठी समर्पित कार्य आणि संतपरंपरेच्या प्रचार-प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान देणारे मा. श्री. गुंडोपंत ईश्वरा पाटील कारभारी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श संत सद्गुरु बाळु मामा सेवेकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूहाच्या वतीने दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना रामनवमीच्या पावन दिनी, ६ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील थेऊर फाटा येथील एस फोर जी हॉटेलमध्ये सकाळी ९ वाजता संपन्न झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.

या गौरवप्रसंगी सिने अभिनेते महेश दादा देवकाते, अभिनेत्री निलोफर पठाण, प्राची पालवे, प्रांजली पवार, अभिनेता सचिन रणपिसे आणि डॉ. मिलिंद स्वामी महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, संत-महंत, साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. गुंडोपंत पाटील कारभारी यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू लोकांसाठी निःस्वार्थ सेवा केली आहे.

संत सद्गुरु बाळु मामा यांची शिकवण आणि विचार समाजात रुजवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तगण आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागी झाले आहेत.राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूहाच्या मुख्य संपादक मा. राहुल कुदनर यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. सेवा, समर्पण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा संकल्प या माध्यमातून साकारला जात आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळेल आणि नव्या पिढीला समाजसेवेसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. गुंडोपंत ईश्वरा पाटील कारभारी यांच्या सन्मानामुळे संतपरंपरेच्या कार्याला नवी दिशा लाभेल, तर त्यांच्या समाजसेवेच्या प्रेरणादायी वाटचालीमुळे अनेकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा संदेश मिळेल.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.7 ° C
25.7 °
25.7 °
88 %
0.5kmh
100 %
Mon
26 °
Tue
27 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
32 °

Most Popular

error: Content is protected !!