Homeमहाराष्ट्रहनुमान मंदिरात एकतारी भजनी मंडळाच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी

हनुमान मंदिरात एकतारी भजनी मंडळाच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी

श्रीरामपूर – शहरातील जागृत देवस्थान असलेल्या हनुमान मंदिरात रामनवमीचा उत्सव एकतारी भजनी मंडळाच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामनामाचा जयघोष करत वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाची सुरुवात भजन-कीर्तनाने झाली, ज्यात गहिनीनाथ भजनी मंडळ, हरिहर भजनी मंडळ यांचे विशेष योगदान लाभले.

त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये भजनी मंडळाचे सदस्य भानुदास साठे, जयराम बाबा, गोरक्षनाथ शिंदे, विष्णू महाराज, बाळू जगधने, दयानाथ महाराज, शिवराज कर्कम, शरद शेरकर, सुरेश जाधव, विजू हारवाले, सुमित दळवे तसेच भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल आदींचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान मंदिराचे मुख्य पुजारी यांचा विशेष सत्कार भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हानिफ पठाण, शिवस्वराज्य मंचचे संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण, युवा नेते विशाल मोजे, अब्दुल भाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अ‍ॅड. रमेश कोळेकर, सिकंदर भाई तांबोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, जिल्हाप्रमुख रज्जाक भाई शेख, रमिज पोपटिया, संदिप शेठ शेडगे आणि सागर चापाणेरकर यांच्या हस्ते भजनी मंडळांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी गंगुबाई त्रिभुवन यांनी सर्व मान्यवर, भाविक व आयोजकांचे आभार मानले. संपूर्ण सोहळा रामभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
35.5 ° C
35.5 °
35.5 °
26 %
2kmh
0 %
Sun
40 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
41 °
Thu
38 °

Most Popular

error: Content is protected !!