Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरात काँग्रेसच्या वतीने मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा

श्रीरामपूरात काँग्रेसच्या वतीने मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- देशात वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ भारतीय युवा काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस श्रीरामपूरमध्ये ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा केला. शहरातील मौलाना आझाद चौकात झालेल्या या अनोख्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह परिसरातील तरुण मोठया संख्येने सहभाग झाल्याचे पाहायला मिळाले.

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ दीपाली ससाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच “दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत देशातील तरुणांना फक्त निराशा दिली,” असा आरोप त्यांनी केला. देशातील इंजिनिअर्स, डॉक्टर, आणि उच्चशिक्षित तरुणही आज नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण पिढीमध्ये नैराश्य वाढले आहे आणि अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहेत. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले, पण वास्तव वेगळेच आल्याचा आरोप केत. हे आंदोलन केवळ पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार नसून, सरकारला त्यांची जबाबदारी आणि दिलेली आश्वासने आठवण करून देण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ दीपाली ससाणे यांनी दिली.

शहरातील मौलाना आझाद चौकात झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनास युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ दिपाली ससाणे, सचिन गुजर, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, पंचायत समितीच्या मा. सभापती डॉ. वंदना मुरकुटे, माजी नगरसेवक दिलीप नागरे, मा. नगरसेवक आण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक शाम अडांगळे, लब्बैक ग्रुपचे अध्यक्ष शाहिद कुरेशी, जावेद शेख, के सी शेळके, मा. नगरसेवक दीपक चव्हाण, प्रवीण नवले, रितेश एडके, कय्युम कुरेशी, युवक काँग्रेसचे सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, आदींसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनातून युवा काँग्रेसने पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. सरकारने लवकरात लवकर ठोस पाऊले उचलून रोजगार निर्मितीवर भर द्यावा, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली आहे. याविषयी अधिक पाहण्यासाठी येथे 👉क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!