Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरकरांनी अनुभवला दहिहंडीचा थरार, परंपरा आणि संस्कृती जोपासणे गरजेचे - जितेंद्र छाजेड

श्रीरामपूरकरांनी अनुभवला दहिहंडीचा थरार, परंपरा आणि संस्कृती जोपासणे गरजेचे – जितेंद्र छाजेड

श्रीराम मंदिर चौकात तरुणाईचा जनसागर उधळला; शंभुराजे ग्रुपने दहिहंडी संघाने सहा थर रचत फोडली हंडी

श्रीरामपूर : युवानेते खा. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, डीजेच्या आवाजात मंगलमय गजर, गोविंदाच्या संगीतावर थिरकणार्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात श्रीरामपूर शहर भारतीय जनता पार्टी व श्रीराम तरुण मंडळ आयोजित दहीहंडीचा थरार श्रीरामपूरकरांनी अनुभवला. मेनरोड वरील श्रीराम मंदिर चौकात तुडुंब गर्दीसमोर शंभुराजे ग्रुपने सहा थर रचत ही दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला.

शहरातील भारतीय जनता पार्टी व श्रीराम तरुण मंडळ यांनी दहिहंडी उत्सव सुरू केला आहे. यावर्षीची दहीहंडी सिनेअभिनेत्री हेमल इंगळे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी १,११,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यामुळे ही हंडी कोण फोडणार यांची उत्सुकता होती. डीजेचा संगीतावर हजारो श्रीरामपूरकरांनी ठेका धरला. यंदा दहीहंडी उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांची विशेष जोड देण्यात आली होती. या प्रसंगी गोकुळाष्टमीच्या पारंपरिक उत्सवाबरोबर देशप्रेम, संस्कृती आणि श्रद्धेचा महोत्सव या घोषवाक्यांनी परिसरात अद्वितीय उर्जा निर्माण झाली. दहीहंडीच्या खेळामध्ये विविध पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्षा डॉ. स्वाती चव्हाण, भाजप नेते संजय फंड यांनी गोविंदा पथकांना व उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. जितेंद्र छाजेड यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “मैत्री, विश्वास आणि मार्गदर्शन व नात्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आहेत. कठीण काळात धाडसाने कसे सामोरे जायचे याचे उदाहरण देखील श्रीकृष्णच आहेत. हाच संदेश लक्षात घेऊन यावर्षी दहीहंडी राष्ट्रप्रेमाच्या थीमवर साजरी केली आहे. विविध सामाजिक कार्यांचा उल्लेख करत त्यांनी युवकांचे कौतुक केले आणि त्यांचा उत्साह वाढवला.या मानाच्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रभक्ती, परंपरा, श्रद्धा आणि एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सर्व युवा सेवकांच्या अथक परिश्रमामुळे आणि श्रीरामपुरकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव ऐतिहासिक ठरला.

यावेळी भाजपचे दीपक पटारे, सतीश सौदागर, विजय आखाड़े, आशीष धनवटे, श्रीनिवास बिहाणी, सचिन गोर्डे, राजेंद्र सोनवणे, गौतम उपाध्ये, अशोक उपाध्ये, मंजूषा ढोकचोळे , पूजा चव्हाण, प्रवीण कोठावळे, राहुल सराफ, आनंद बुधेकर, अक्षय गाडेकर, महेंद्र पटारे, बंडूकुमार शिंदे, महेश सुल, राकेश न्याती, डॉ. शंकरराव मुठे, डॉ. प्रशांत चव्हाण, संदीप चव्हाण, मनसेचे बाबासाहेब शिंदे, शिवसेनेचे संजय छल्लारे, आरपीआयचे सुभाष त्रिभुवन, पुरुषोत्तम झवर, सुर्यकांत सगम, सनी सानप, मनोज लबडे, शशांक रासकर, आशाताई रासकर, तसेच अतुल उपाध्ये, सिद्धार्थ उपाध्ये, मयूर बोरसे, सुमित भावसार, अभिजीत भावसार, आकाश कोठारी, देवेंद्र उपाध्ये, कृष्णा धुवाविया, सुमित कोठारी, हितेश तलरेजा, सुमित उपाध्ये, शैलेश पारख, जयराम उपाध्ये, बाळासाहेब उपाध्ये, विशाल उपाध्ये, राहुल उपाध्ये मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी, युवासेवक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!