Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरप्रभाग २ मध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन दाभाडे यांची कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त...

प्रभाग २ मध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन दाभाडे यांची कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक २ मध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन खु. दाभाडे यांच्या प्रचाराला अधिक वेग आला आहे. अचानक नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी यापूर्वी बाहेरचे उमेदवार लादले जात होते, आता आपल्यातलाच स्थानिक उमेदवार निवडू, असे स्पष्ट मत व्यक्त केले. सभेमध्ये समाजमंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम, प्रभागासाठी रुग्णवाहिका सुविधा आणि विविध विकासकामांचे लोकार्पण या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. अपक्ष उमेदवार दाभाडे यांना मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळे विरोधी उमेदवारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना उद्देशून दाभाडे यांनी आवाहन केले की, कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्थानिक उमेदवारालाच संधी द्या, तोच तुमच्या समस्या नगरपालिका सभागृहात मांडेल.

दरम्यान, घरदार संपर्क, प्रत्यक्ष संवाद व महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच मतदारवर्गातून मिळणारा समर्थनाचा ओघ वाढत आहे. प्रभागातील तक्रारी, पायाभूत समस्या यावर थेट चर्चा करून त्यांचे निराकरण करण्याची तयारी असल्याने नागरिकांमध्ये दाभाडे यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होत आहे. प्रचार मोहिमेला मिळणाऱ्या या प्रतिसादामुळे प्रभाग २ मधील निवडणूक अधिक चुरशीची होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!