Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरप्रभाग १ मध्ये काँग्रेसची आघाडी: सोनिया बिट्टू कक्कड–दिपक वमने यांच्या प्रचाराला जोरदार...

प्रभाग १ मध्ये काँग्रेसची आघाडी: सोनिया बिट्टू कक्कड–दिपक वमने यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसच्या जोडीने लक्षणीय आघाडी घेतल्याचे चित्र शनिवारीपर्यंत स्पष्टपणे दिसून आले आहे. सोनिया बिट्टू कक्कड आणि दिपक वमने या उमेदवारांच्या प्रचाराला परिसरातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, घराघरांत सुरू असलेल्या संपर्क मोहिमेमुळे काँग्रेसची पकड अधिक मजबूत होत असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळांचे निरीक्षण आहे.

सोनिया कक्कड यांच्या शांत, सर्वसमावेशक व संवादक्षम व्यक्तिमत्त्वासोबत दिपक वमने यांची तरुण नेतृत्वशैली, क्षेत्रातील लोकांशी नाळ जुळवण्याची पद्धत आणि सातत्यपूर्ण संपर्क यामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि नवमतदारांमध्ये या जोडीविषयी उत्सुकता व विश्वास वाढताना दिसतो.गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार मोहिमेत रस्त्यांवरील जलद गती, सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेली पायी फेरी, सार्वजनिक संवाद कार्यक्रम, स्थानिक व्यापाऱ्यांना दिलेल्या भेटी आणि समस्या जाणून घेण्याच्या पद्धतीमुळे काँग्रेसची छाप अधिक ठळक बनली आहे. नागरिकांना दिलासा देणाऱ्या घोषणा रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची शाश्वत सोय, स्वच्छता मोहिमेचे उन्नतीकरण, अतिक्रमणमुक्त बाजारपेठ, तसेच महिला सुरक्षा या मुद्द्यांवर स्थानिक नागरिकांकडून चांगली दाद मिळत असल्याचे दिसून येते. प्रभाग १ मध्ये गेल्या काही वर्षांत रस्त्यांची अवस्था, कचरा व्यवस्थापन, करप्रणालीतील तक्रारी आणि काही भागात होत असलेली वाहतुकीची कोंडी हे मुद्दे प्रमुख राहिले आहेत. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार मतदारांना समस्यांचे ठोस समाधान देण्याचे आश्वासन देत असल्याने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.

काँग्रेस युवा शहराध्यक्ष रितेश चव्हाणके यांनी सांगितले की, “या वेळी आमचा प्रचार फक्त आश्वासनांचा नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा रोडमॅप लोकांसमोर ठेवत आहोत. दोन तरुण, स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी योग्य आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे इतर पक्षांच्या प्रचारात अपेक्षित वेग दिसून येत नसल्याचेही नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे. प्रभागातील काही भागात विरोधकांचे प्रचारफेरे कमी प्रमाणात दिसत असल्याने काँग्रेसची आघाडी अधिक ठळक झाली आहे, असे स्थानिक विश्लेषक मानत आहेत.

सोनिया बिट्टू कक्कड व दिपक वमने यांच्या प्रचाराचा वेग पाहता, प्रभाग १ मधील लढत अधिक रंजक आणि एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र अंतिम क्षणी समीकरणे कशी बदलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचणार असून, काँग्रेसची ही आघाडी टिकते की इतर पक्षांकडून प्रत्युत्तरात्मक मोहीम येते, यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!