Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरॲड. समीन बागवान यांचा भाजपात जाहीर प्रवेश; काँग्रेसला मोठा धक्का, श्रीरामपूर राजकारणात...

ॲड. समीन बागवान यांचा भाजपात जाहीर प्रवेश; काँग्रेसला मोठा धक्का, श्रीरामपूर राजकारणात नवी समीकरणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच डॉ. सुधीर तांबे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले ॲड. समीन बागवान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात प्रामाणिक, एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम पाहणारे समीन बागवान यांनी 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाहीर सभांमधून प्रभावी, मुद्देसूद भाषणे करून काँग्रेसच्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण करणारे बागवान यांनी पक्षश्रेष्ठीकडून वारंवार दुर्लक्षित असल्याने नाराजी व्यक्त केली होती. नगरपालिका निवडणुकीत झालेल्या अन्यायानंतर त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे समजते. भाजपामध्ये प्रवेश करताना त्यांनी दीन दलित, अल्पसंख्याक व शेतकरी यांच्यासाठी पक्षाची सर्वसमावेशक भूमिका, विकासाचे धोरण तसेच अल्पसंख्याक समाजाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. कायदेशीर, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या अनुभवी आणि उच्च शिक्षणामुळे अधिक चांगली सेवा देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

या प्रसंगी पालकमंत्री विखे पाटील यांनी ॲड. बागवान यांच्या प्रवेशाचे स्वागत करत न्याय व विकास मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील काळात श्रीरामपूरच्या राजकारणात बागवान यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक पटारे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, रवि पाटील, केतन खोरे, नजीर मुलानी, मुख़्तार शाह यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. समीन बागवान यांच्यासोबत अनेक समर्थकांनीही पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून मुस्लिम समाज व विविध स्थानिक गट मोठ्या प्रमाणावर भाजपात जोडले जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वार्ड क्रमांक २ आणि संजय नगर भागातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून, स्थानिक निवडणुकांवर या हालचालींचा मोठा परिणाम होईल, असे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!