Homeमोठी बातमीसंगमनेरात १६ वर्षीय मुलीवर डॉक्टरकडून अत्याचार; पोक्सोखाली गुन्हा दाखल

संगमनेरात १६ वर्षीय मुलीवर डॉक्टरकडून अत्याचार; पोक्सोखाली गुन्हा दाखल

संगमनेर (जि. अहिल्यानगर) – शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १६ वर्षीय कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ६ एप्रिल) पहाटे घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर पसार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बारावीमध्ये शिकत असून, ती ४ एप्रिलपासून नवीन नगर रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. रविवारी पहाटे सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्टर अमोल कर्पे यांनी पीडितेची विचारपूस करण्याच्या बहाण्याने तिला रुग्णालयाच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करत तिला धमकी दिली. घडलेल्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या पीडित तरुणीने पुढे धैर्याने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांच्या सहकार्याने पीडितेने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून डॉक्टर अमोल कर्पे याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फराहनाज पटेल पुढील तपास करत आहेत.घटनेनंतर पसार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी अल्पावधीत शोधून काढले व ताब्यात घेतले. या गंभीर प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन, नागरिक, तसेच वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, संबंधित डॉक्टरवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.अशा घटनांमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!