Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर शहरात बिंगोचा जोर; पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह?

श्रीरामपूर शहरात बिंगोचा जोर; पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह?

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर ‘बिंगो’ (जुगार) खेळाचा जोर वाढल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू असून त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील काही ठिकाणी खुलेआम बिंगोचे अड्डे सुरू असल्याचे समोर येत असून या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वॉर्ड क्रमांक २ मधील मटण मार्केट परिसर, बेलापूर रोड, बसस्थानक परिसर, नॉर्दन ब्रँच ते सूतगिरणी फाटा तसेच बाजारतळ परिसरात बिंगोचे अड्डे सुरू असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून युवक जुगाराच्या आहारी जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, शहरात उघडपणे असे प्रकार सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित ती कठोर कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. या अड्ड्यांमुळे परिसरात वादविवाद व भांडणाचे प्रकार घडण्याची शक्यता असून अनेक तरुण आर्थिक नुकसान सहन करत असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमच्या प्रतिनिधीच्या हाती बिंगोचा खेळ सुरू असल्याचा एक व्हिडिओ देखील लागला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक अधोरेखित झाली असून आता पोलीस प्रशासन या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नागरिकांकडून बेकायदेशीर बिंगो अड्ड्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चौकट

शहरातील बेकायदेशीर बिंगो अड्ड्यांबाबत आमच्या प्रतिनिधींनी शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, शहरातील बहुतांश अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने यापूर्वीच कारवाई करून ते बंद केले आहेत. तरीही कुठे बिंगो किंवा इतर बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. अशा प्रकारांची माहिती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
24.1 ° C
24.1 °
24.1 °
18 %
2kmh
4 %
Sat
24 °
Sun
38 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
38 °

Most Popular

error: Content is protected !!