Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग या गटांसाठी आरक्षण ठरविण्यात येणार आहे. या सोडतीचा कार्यक्रम बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर येथील मिटिंग हॉलमध्ये होणार आहे.

या सोडतीनंतर आरक्षणाचा अधिकृत तपशील गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षणाबाबत ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. या काळात दुपारी ३.०० वाजेपर्यंत नगरपरिषदेच्या निवडणूक कक्षात मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात हरकती दाखल करता येतील. हरकती दाखल करणाऱ्यांना आवश्यकतेनुसार सुनावणीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीतील ही आरक्षण सोडत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, स्थानिक राजकीय वर्तुळातही याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. या माध्यमातून प्रत्येक प्रवर्गातील महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.या संपूर्ण प्रक्रियेबाबत माहिती देताना श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप यांनी नागरिकांना ठरविलेल्या तारखांमध्ये आपापल्या हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!