Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरात पुन्हा नशेच्या इंजेक्शन विरोधात पोलिसांची धडक कारवाई, ५० सीलबंद बाटल्या जप्त

श्रीरामपूरात पुन्हा नशेच्या इंजेक्शन विरोधात पोलिसांची धडक कारवाई, ५० सीलबंद बाटल्या जप्त

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत जिजामाता चौक परिसरातून नशेच्या मेफेटरमाइन इंजेक्शनच्या ५० सीलबंद बाटल्यांसह एका तरुणाला गजाआड केले आहे. परवेज जमीर शेख (वय २३, रा. श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव असून, आरोपी ऑनलाईन वेबसाइटच्या माध्यमातून ही घातक इंजेक्शन्स मागवून शहरात गुप्तपणे विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

यापूर्वी अवघ्या दहा दिवसांपूर्वीही अशाच पद्धतीने ऑनलाईन नशेची इंजेक्शन्स मागवून विक्री करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. या सलग कारवायांमुळे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीमागे एखादी मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय अधिक दृढ झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.

या कारवाईसंदर्भात अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परवेज शेख विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२३, १२५ आणि २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात गुरफटण्यापासून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून, नशेच्या इंजेक्शनच्या विक्रीत सहभागी असलेल्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, अमोल पडोळे, सचिन दुकळे, संभाजी खरात, अजित पटारे, राहुल पौळ, आजिनाथ आंधळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मिरा सरग तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांचा समावेश होता.

शहरात वाढत्या नशेच्या इंजेक्शनच्या वापरामुळे समाजजीवनावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली आहे. या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीरामपूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरातील नशेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

याविषयी अधिक माहितीसाठी

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
13.1 ° C
13.1 °
13.1 °
44 %
2kmh
0 %
Tue
29 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!