Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; 5 गावठी पिस्टलसह 3...

श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; 5 गावठी पिस्टलसह 3 आरोपींना अटक.

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरात मागील आठवड्यात भरदिवसा घडलेल्या गावठी कट्ट्याच्या थरारानंतर पोलीस प्रशासनाने आपली कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. श्रीरामपूरातील वाढत असलेल्या गुन्हेगारीला लक्षात घेत, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ ॲक्शन मोडवर येत श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा उड्डाणपुलाजवळ सापळा रचून मोठी कारवाई केली. या धडाकेबाज मोहिमेत ५ गावठी पिस्टल आणि ९ जिवंत काडतुसांसह ३ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईतून अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत नेवासा येथील अक्षय उर्फ भावड्या माळी, अजय मगर आणि नगर येथील योगेश निकम या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून. पोलिसांनी आरोपींकडून ५ गावठी पिस्टल, ९ जिवंत काडतुसे आणि एक बजाज प्लसर दुचाकी असा एकूण ४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. पोलिसांच्या या निर्णायक कारवाईमुळे श्रीरामपुरातील गुन्हेगारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. तर, सर्वसामान्य नागरिकांमधून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, दिपक घाटकर, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे आदींच्या पथकाने सापळा रचून यशस्वी कारवाई केली असून. अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होणार असून, यापुढील काळात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नेमकी काय घडलं पाहण्यासाठी इथं 👉क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!