Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरमध्ये गावठी कट्टया प्रकरणातील दोन्ही आरोपी कट्टयासह जेरबंद

श्रीरामपूरमध्ये गावठी कट्टया प्रकरणातील दोन्ही आरोपी कट्टयासह जेरबंद

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरात २९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी रोडवर झालेल्या गावठी कट्ट्याच्या थरारक घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सदरची घटना शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वादातून झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. शहरातील दोन टोळ्यांमधील जुन्या वादातूनच ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि दोन्ही आरोपींना पकडण्यात यश मिळवले. तसेच, या घटनेतील दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस स्वतः फिर्यादी झाले आहेत.

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून, पोलिसांनी अशा गुन्हेगारांची एक यादी तयार केली आहे. यापुढे कोणताही गुन्हेगार पोलिसांच्या टप्प्यात आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लस नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, राम शिखरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, दादाभाई मगरे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिद्र कातकडे,सचिन काकडे,अमोल पडोळे, अमोल गायकवाड, आंबादास आंधळे, अजित पटारे, आजिनाथ आंधळे, संपत बडे, सागर बनसोडे, ज्ञानेश्वर वाघमोडे, समीर फकीर, सचिन दुकळे, बाळासाहेब गिरी आदींनी केली असून.शहरातील कट्टयाच्या थरार नंतर ॲक्शन मोडवर आलेल्या पोलिसांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात सुरू केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. काय आहे नेमकी हा प्रकार हे पहा 👉 क्लिक

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!