श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) श्रीरामपूरमध्ये चौथ्या मोठ्या पक्षप्रवेशाच्या तयारीत असून, यावेळी एक भाजपचा वरिष्ठ आणि प्रभावशाली नेता या गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.सदर पक्षप्रवेश मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेत गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय नेत्यांचे प्रवेश होत असल्याने स्थानिक पातळीवर शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.दरम्यान, शहर व तालुक्यात या नव्या प्रवेशाबाबत मोठी चर्चा रंगली असून, “कोणता भाजप नेता शिंदे गटात दाखल होणार?” या प्रश्नाचे उत्तर सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरले आहे. सूत्रांच्या मते, संबंधित नेत्याचा शहर आणि ग्रामीण भागात मोठा जनाधार असल्याने या प्रवेशानंतर स्थानिक राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडीमुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी पुढील काही दिवसांत आणखी काही महत्त्वपूर्ण प्रवेश होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
श्रीरामपूरच्या राजकारणात उलथापालथ! मुंबईत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार भाजप नेत्याचा प्रवेश
RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4
°
C
22.4
°
22.4
°
62 %
1.7kmh
100 %
Sat
35
°
Sun
36
°
Mon
39
°
Tue
38
°
Wed
37
°




