Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपुरात गोळीबारानंतर आता 'रेकी' चा थरार ! माजी नगरसेवक टार्गेटवर ?

श्रीरामपुरात गोळीबारानंतर आता ‘रेकी’ चा थरार ! माजी नगरसेवक टार्गेटवर ?

श्रीरामपूर : शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तींचा धोका समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गोळीबारानंतर आता भाजपचे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्यावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पाटील यांच्या कार्यालयाची रेकी करणारे दोन संशयित तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. शहरातील भगतसिंग चौकात असलेल्या रवी पाटील यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. तोंडाला रुमाल बांधलेले आणि नंबर नसलेल्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी संशयास्पदरीत्या रेकी केली.

धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्यापैकी एकाच्या कमरेला बंदूक लावलेली स्पष्ट दिसत आहे. हा सर्व प्रकार कार्यालयाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी शहरात गावठी कट्ट्यांचा वापर करून थरार घडवणाऱ्या आरोपींचा शोध अद्याप सुरू असतानाच, ही नवीन घटना समोर आली आहे. अनेक ठिकाणी या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. माजी नगरसेवक रवी पाटील यांच्यावर यापूर्वीही चार वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा खुलासा झाल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

या गंभीर घटनेनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून, या अज्ञात गुन्हेगारांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकी काय घडलं पाहण्यासाठी इथं 👉क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!