Homeमहाराष्ट्रशिर्डीशिर्डीत वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई; चार हॉटेल्स सील

शिर्डीत वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई; चार हॉटेल्स सील

शिर्डी (प्रतिनिधी) – शहरात वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत चार हॉटेल्स एक वर्षासाठी सील केली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी माणिक आहेर आणि पोलिस निरीक्षक रंजीत गलांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी या हॉटेल्सवर पिटा (PITA) कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला. न्यायालयाने निकाल देत सदर आस्थापना एक ते तीन वर्षे कटीबंद करण्याचे आदेश देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हॉटेल साई वसंत विहार, हॉटेल शिर्डी साई इन, हॉटेल साई वीरभद्र आणि हॉटेल साई शीतल ही चार हॉटेल्स एक वर्षासाठी सील करण्यात आली.

या हॉटेल्सचे चालक व मालक साई वसंत विहार चे कृष्णा प्रकाश कोळपकर, शुभम अशोक आदमाने, नानासाहेब जगन्नाथ शेळके , हॉटेल शिर्डी साई इन चे अनुप गणपत गोंधकर, श्रीमती शितल हार्दिक चौधरी, प्रमिला गणपत गोंधकर ,हॉटेल साई वीरभद्र चे भगवान मुक्ताजी बनकर, ऋषिकेश अनिल वाघ, दिपक आत्माराम निंबाळकर, भाऊसाहेब साहेबराव जगताप, हॉटेल साई शीतल चे राजेंद्र सिताराम गाडेकर आणि बाबासाहेब भीमराव चौधरी यांच्यावर ही कारवाई झाली.

नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, एकूण सात हॉटेल्सचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले होते. त्यापैकी चार हॉटेल्सवर कारवाई झाली असून उर्वरित तीन हॉटेल्सबाबतचे आदेश काही दिवसांत मिळतील. शिर्डीत वेश्याव्यवसायासाठी हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. यापुढेही अशा धडक कारवाया सुरू राहतील. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनाने दिलेला इशारा लक्षात घेता अनेकजण सजग झाले आहेत. वेश्याव्यवसायास प्रोत्साहन देणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली चला पाहूया

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!