Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरबेलापूर बुद्रुक परिसरात तलवारीसह इसम अटकेत, पोलिसांची धडक मोठी कारवाई

बेलापूर बुद्रुक परिसरात तलवारीसह इसम अटकेत, पोलिसांची धडक मोठी कारवाई

भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – प्रवरा नदीपात्र, बेलापूर बुद्रुक परिसरात एक इसम लोखंडी पातेच्या तलवारीसह फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्काळ धडक कारवाई करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास करण्यात आली.

श्रीरामपूर शहर पोलिसांना आज गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बेलापूर बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्र परिसरात एक व्यक्ती तलवार घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलिस निरीक्षक यांच्या आदेशान्वये बेलापूर पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, पंकज सानप आणि भारत तमनर यांनी तत्काळ पथक तयार करून नदीपात्र गाठले.

दरम्यान, पोलिसांनी प्रवरा नदी परिसरात तपास मोहिम राबवली असता, एक संशयित इसम लोखंडी पातेची तलवार घेऊन फिरताना आढळला. पोलिसांनी त्यास तात्काळ ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव वैभव बाळासाहेब माळवादे (वय 24 वर्षे, रा. मुसळवाडी, टाकळी मिया, ता. राहुरी) असे समोर आले. पंचांच्या उपस्थितीत तलवार जप्त करण्यात आली असून पंचनामा करून संशयितास बेलापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव माळवादे याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बेलापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्थानिक परिसरात उघडपणे धारदार शस्त्र घेऊन फिरण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी वेळेवर दाखविलेली तत्परता व दक्षता यांचे कौतुक होत आहे. या कारवाईमुळे अनिष्ट घटना टळली, असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!