Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरबेलापुरातील घटनेचे सत्य पोलिसांकडून उघड; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बेलापुरातील घटनेचे सत्य पोलिसांकडून उघड; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापुर येथे काल ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान बेलापूरात काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या फ्लेक्सवरील फोटो फाडण्याचा प्रयत्न केल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली, ज्यामुळे बेलापुरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली.

मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची सखोल चौकशी केली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी स्वतः खुलासा करत, फ्लेक्सवरील फोटो फाटला नसल्याचे स्पष्ट केले. ही निव्वळ एक अफवा असून, कोणीतरी जाणूनबुजून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, समाधान सोळंकी आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये. सत्यता तपासल्याशिवाय कोणत्याही माहितीवर प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटने संदर्भात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी काय खुलासा केला हे पाहण्यासाठी इथे 👉क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!